हिवाळ्यात आजाराने बेजार व्हायचे नसेल तर हे पाच पदार्थ खाणे टाळा

food 1.jpg
food 1.jpg

देशात हिवाळ्याचा मौसम सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे. थंडीचा हा हंगाम जीवाणू (बॅक्टेरिया) वाढीसाठी अत्यंत पोषक असतो. त्याचबरोबर कमी झालेल्या तापमानामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होतो. या दोन गोष्टींचा सरळ अर्थ हा आहे की, थंडीच्या काळात आपण आजारी पडण्याची जास्त शक्यता असते. 

बहुतांशवेळा आजारापासून वाचण्यासाठी लोक कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा याचा सल्ला देतात. परंतु, खाण्या-पिण्याचे काही असे पदार्थ असतात ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो. त्यापासून बचाव करण्याबाबत कोणी बोलत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पाच पदार्थांबाबत सांगणार आहोत, ज्यामुळे हिवाळ्यादरम्यान या पदार्थापासून दूर राहणेच आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

तळलेले पदार्थ (फ्राइड फूड)
तळलेले पदार्थ आपल्या आहाराच्या यादीत बाहेर राहण्यासाठीच बनलेले आहेत, असे वाटते. तळलेले पदार्थ खायला चांगले लागत असले तरी अशा पदार्थांमध्ये फॅट भरपूर प्रमाणात असतात. जास्त फॅट असलेल्या पदार्थांमुळे केवळ पित्तच नव्हे तर यामुळे कफही वाढतो. यामुळे आपल्याला मोठ्या त्रासास सामोरे जाण्याची शक्यता निर्माण होते. 

हिस्टामिनयुक्त पदार्थ
हिस्टामिनयुक्त पदार्थांचे भरपूर सेवन घातक ठरु शकते. हिस्टामिनयुक्त पदार्थ जसे अंडे, मशरुम, टोमॅटो, सुका मेवा आणि योगर्ट या पदार्थांमुळे इतर खाद्य पदार्थांपेक्षा जास्त कफ तयार होतो. त्यामुळे नाक बंद होणे, छातीत कफ भरण्याची समस्या होऊ शकते. 

कॅफिनयुक्त पेय
कॉफी, एनर्जी ड्रिंक्स, स्पोर्ट्स ड्रिंक्स आणि इतर पेयांमध्ये कॅफिन असते. कॅफिन हे एक diuretic आहे. यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे कफ आणि घशामध्ये त्रास सुरु होतो. छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. 

डेअरी प्रॉडक्ट्स
साधारणतः डॉक्टर हे तुमच्या घशाला त्रास होत असेल किंवा, सर्दी-ताप किंवा छातीत कफ झाल्यास डेअरीतील उत्पादनांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. दूध आणि पनीर सारखे डेअरी प्रॉडक्ट्स कफ वाढवतात. ज्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होतो. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. 

जास्त साखर असणारे पदार्थ
केक असो किंवा कँडिज किंवा कोल्डड्रिंक, पॅक्ड फ्रूट ज्यूस वा सॉफ्ट ड्रिंक्ससारखे पेय किंवा जास्त साखर असणारे कोणतेही पदार्थ आजाराला कारणीभूत ठरु शकतात. हे पदार्थ खाण्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. परंतु, तुमच्या शरीरासाठी असे पदार्थ एखाद्या शत्रूपेक्षा कमी नाही. यामुळे तुमची रोग प्रतिकारक क्षमता कमी होण्याची शक्यता असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com