देवानं, फक्त शाकाहारी जेवण करून मंदिरात या असं म्हटलंय का? सिद्धरामय्या भाजपवर भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress leader Siddaramaiah

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं मांसाहार करून मंदिरात जाण्याच्या आरोपाचं तीव्र शब्दांत खंडन केलंय.

देवानं, फक्त शाकाहारी जेवण करून मंदिरात या असं म्हटलंय का? सिद्धरामय्या भाजपवर भडकले

बंगळुरु : कर्नाटकचे (Karnataka) माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Congress leader Siddaramaiah) यांनी मांसाहार करून मंदिरात जाण्याच्या आरोपाचं तीव्र शब्दांत खंडन केलंय. मांसाहार करून मंदिरात गेलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्या दिवशी मी फक्त शाकाहारी जेवण केलं होतं. त्याचबरोबर खऱ्या मुद्द्यांपासून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजप (BJP) अशा गोष्टी करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

सिद्धरामय्यांनी नुकतंच कोडगु जिल्ह्याच्या (Kodagu District) दौऱ्यात एका मंदिराला भेट दिली होती. सिद्धरामय्या मांसाहार करून मंदिरात गेले, त्यामुळं हिंदूंच्या धार्मिक (Hinduism) भावना दुखावल्या, असं भाजप नेत्यांनी सांगितलं. मात्र सिद्धरामय्या म्हणाले, 'भाजप नेत्यांना दुसरं काम नाहीय, त्यामुळं अनावश्यक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. देशातील मोठ्या समस्यांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नेते अशी कृत्ये करत आहेत.'

हेही वाचा: दोन दिवसांत 'तो' शब्द फिरला अन् मविआ सरकार स्थापन झालं; देसाईंनी सांगितली हकीकत

माझ्याकडं चिकन करी खाण्याचा पर्याय होता, पण..

माजी मुख्यमंत्री म्हणाले, मांस खाऊन मंदिरात जाणं हा माझ्यासाठी मुद्दा नाहीय. बरेच लोक मांसाहार न करता मंदिरात जातात, तर काही लोक मांसाहार करूनही देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. अनेक ठिकाणी देवतांना मांस अर्पण केलं जातं. खरं सांगू, कोडीलीपेठच्या बसवेश्वर मंदिरात गेलो होतो, त्या दिवशी मी मांस खाल्लं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 'मंदिरात जाण्यापूर्वी मी जे अन्न खाल्लं ते शाकाहारी होतं. होय, मग माझ्याकडं चिकन करी खाण्याचा पर्याय होता. त्या दिवशी मंदिरात दर्शन घेण्यापूर्वी मी 'बांबू शूट कढी' आणि 'अक्की रोटी' घेतली होती. मी एक मांसाहारी आहे आणि ही माझी खाण्याची सवय आहे. आता प्रश्न पडतो की, देवानं मंदिरात जाण्यापूर्वी काय खावं आणि काय करू नये असं सांगितलंय का?'

हेही वाचा: महागठबंधन सरकार विधानसभेत आज बहुमत सिद्ध करणार; तेजस्वी यादवांनी जारी केला 'व्हीप'

'तुमच्यात हिम्मत असेल तर डुकराचं मांस खा आणि मशिदीत जा.'

याआधी ज्येष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सिद्धरामय्यांना आव्हान दिलं होतं, 'तुमच्यात (सिद्धरामय्या) हिम्मत असेल तर डुकराचं मांस खा आणि मशिदीत जा.' या आव्हानाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, 'मी फक्त चिकन आणि मटण खातो, इतर मांस (डुकराचं मांस किंवा गोमांस) खात नाही. पण, जे खातात त्यांना माझा विरोध नाही. कारण, ही त्यांची खाण्याची सवय आहे.'

Web Title: Did God Say To Eat Only Vegetarian Food And Come To The Temple Congress Leader Siddaramaiah

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..