पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

petrol pump

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांकडून आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. डिझेलची किंमत 26 ते 30 पैशांपर्यंत वाढली आहे तर पेट्रोलची किंमत देखील 24 ते 27 पैशांपर्यंत वाढली आहे. मंगळवारी डिझेलची किंमत 23 पैसे तर पेट्रोलची किंमत 26 पैशांपर्यंत वाढली होती. पहिल्यांदाच मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे. वाहनाच्या इंधनांच्या किंमतींमध्ये एका महिन्यांतच 17 वेळा वाढ केली गेल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मंगळवारी एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचल्या आहेत.

हेही वाचा: 'ताकतच पहायची असेल तर....' संभाजीराजेंचे नारायण राणेंना उत्तर

चार मेपासून तब्बल 18 वेळा किंमती वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 27 पैशांनी वाढून 94.49 प्रति लिटर ते 94.76 प्रति लिटरवर पोहोचली आहे तर डिझेलची किंमत 28 पैशांनी वाढून 85.38 रुपये प्रति लिटर ते 85.66 प्रति लिटरवर पोहोचली आहे.

मुंबईमध्ये 29 मे रोजीच पेट्रोलच्या किंमतींनी 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. सध्या मुंबईमध्ये पेट्रोल 100.98 रुपये प्रति लिटरने मिळत आहे तर डिझेल 92.99 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक शहरांमध्ये यापूर्वीच पेट्रोलच्या किंमतींनी शंभरचा टप्पा पार केला आहे.

हेही वाचा: चीनने अमेरिकेला 10 ट्रिलियन डॉलर द्यावेत; ट्रम्प यांची मागणी

City Petrol Diesel

Delhi 94.76 85.66

Mumbai 100.98 92.99

Chennai 96.23 90.38

Kolkata 94.76 88.51