IPS इतका भ्रष्टाचारी, ७.५ कोटी एका दिवसात नाही आले; व्यवस्था झोपलेली का? राज्यपालांचा संतप्त सवाल

DIG Bhullar Case : पंजाबमधील आयपीएस अधिकारी भुल्लरला भ्रष्टाचार प्रकरणी अटक झालीय. सीबीआयने त्याच्या निवासस्थानी साडे सात कोटींची रोकड, अडीच किलो सोनं आणि २६ महागडी घड्याळं जप्त केली आहेत.
IPS Officer Arrested in Punjab CBI Recovers Crores of Cash Gold and Luxury Watches

IPS Officer Arrested in Punjab CBI Recovers Crores of Cash Gold and Luxury Watches

Esakal

Updated on

पंजाबमध्ये आयपीएस अधिकारी हरचरण सिंह भुल्लर याला भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआयने अटक केल्यानंतर खळबळ उडालीय. सीबीआयने १० लाखांची लाच घेताना आयपीएस अधिकारी भुल्लरला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर छाप्यात त्याच्याकडे साडे सात कोटी रुपयांची रोकड आढळली होती. आता या प्रकरणावर पंजाबचे राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनी संताप व्यक्त केला आहे. भुल्लरला भ्रष्टाचार प्रकरणी अटक ही एक डोळे उघडायला लावणारी घटना आहे. ही घटना वरच्या पातळीवर भ्रष्टाचार किती फोफावलाय हे उघडकीस आणतेय, हे खूपच दुर्दैवी असल्याचं मत राज्यपाल गुलाब चंद कटारिया यांनी व्यक्त केलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com