

DIG officer Crime
ESakal
बंगळूर : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या शंकर नावाच्या कैद्याची सर्वोच्च न्यायालयाचा बनावट आदेश तयार करून सुटका केल्याप्रकरणी परप्पन अग्रहार कारागृहाचे उपमहानिरीक्षक सोमशेखर यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात त्यांच्या भूमिकेची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील बनावट कागदपत्र तत्कालीन कारागृहातील कनिष्ठ विभाग सहायक (एसडीए) श्रीकांत एस. याने तयार केल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर कैद्याची सुटका करण्यासाठी त्याच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार देखील उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ पसरली आहे.