जमिनीखाली पुरलेली मुलगी पाहा आता दिसते कशी...

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

उत्तर प्रदेशात एका खड्डा खोदताना हंड्यामध्ये सापडलेल्या मुलीची प्रकृती सुधारली असून, ती ठणठणीत झाली आहे. मात्र, अद्यापही तिच्या पालकांचा शोध लागलेला नाही.

बरेली: उत्तर प्रदेशात एका खड्डा खोदताना हंड्यामध्ये सापडलेल्या मुलीची प्रकृती सुधारली असून, ती ठणठणीत झाली आहे. मात्र, अद्यापही तिच्या पालकांचा शोध लागलेला नाही.

ऑक्टोबर महिन्यात 'देव तारी त्याला कोण मारी...' या म्हणीचा प्रत्यय आला होता. एक पिता आपल्या मृत झालेल्या चिमुकलीला दफन करण्यासाठी खड्डा खोदत असताना अचानक खड्यामध्ये हंडा सापडला. मातीने गाडलेल्या खड्ड्यामधील हंड्यात जिवंत चिमुकली आढळून आली होती. मातीने गाडलेल्या खड्ड्यामध्ये चिमुकली जीवंत आढळल्यामुळे खळबळ उडाली होती.

खड्ड्यामधून चिमुकलीला जीवंत बाहेर काढल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. तिचे वजन केवळ 1.1 किलो होते. तिला ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. शिवाय, तिच्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. मात्र, उपचारानंतर तिची प्रकृती सुधारली आहे. बरेली जिल्ह्यातील सामाजिक कल्याण खात्याचे अधिकारी सध्या या मुलीची देखभाल करत आहेत. या मुलीचे पालक कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. ठराविक वेळेची पूर्तता केल्यानंतर ही मुलगी एखाद्या जोडप्याला दत्तक घेता येईल, असे अधिकाऱयांनी सांगितले.

सविस्तर माहिती अशी, 'एका नवजात चिमुकलीचा अचानक मृत्यू झाला. चिमुकलीच्या जाण्याने कुटुंबियांवर दुःख पसरले. पिता जड अंतकरणाने चिमुकलीचा मृतदेह दफन करण्यासाठी स्मशान भूमित गेला. चिमुकलीला दफन करण्यासाठी खड्डा खोदत होता. खड्ड्यामध्ये अचानक एक हंडा सापडला. धक्कादायक म्हणजे या हंड्यात जिवंत पुरलेली मुलगी सापडली. आपली चिमुकली गेली असताना या मुलीच्या रूपात देवानेच आपल्याला हे कन्यारत्न भेट दिले, असे समजून पित्याने या मुलीचा स्वीकार केला होता.'

पोलिस अधीक्षक अभिनंदन सिंह यांनी सांगितले की, 'बरेली शहरातील सीबीगंज येथील वेस्टर्न कॉलनी येथील रहिवासी हितेश कुमार सिरोही यांच्या घरी गुरुवारी (ता. 10) एका मुलीचा जन्म झाला होता. मात्र, या मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांसह तिचे वडील अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला स्मशानात घेऊन गेले. मृतदेह पुरण्यासाठी त्यांनी सुमारे तीन फूट खोल खड्डा खणला. त्यादरम्यान खड्डा खोदत असलेल्या कामगाराच्या खोऱयाला एक हंडा लागला. हंडा बाहेर काढला असताना त्यात एक जिवंत नवजात मुलगी सापडली. बराच वेळ जमिनीखाली राहिल्याने तिचे श्वसन वेगात सुरू होते. हितेश याने या मुलीचा स्वीकार केला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे कोणी या मुलीला जीवंत पुरले याचा शोध घेतला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digging grave stillborn people find another girl buried now she is good condition