आता तरी राफेलची किंमत सांगा; दिग्विजय सिंहाची मोदींवर टीका

अशोक गव्हाणे
बुधवार, 29 जुलै 2020

राफेलच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राफेल व्यवहाराविषयी मोदी सरकारने आतातरी बोलावे असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. राफेल भारतात दाखल झाल्यावर तरी त्याच्या किंमती जाहीर कराव्यात अशी मागणीच त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली : राफेलच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते आणि माजी मंत्री दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राफेल व्यवहाराविषयी मोदी सरकारने आतातरी बोलावे असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. राफेल भारतात दाखल झाल्यावर तरी त्याच्या किंमती जाहीर कराव्यात अशी मागणीच त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारत आणि फ्रांस यांच्यात ३५ राफेल फायटर विमानांची डील झाली असून आज (ता. २९) काही राफेल विमाने भारतात दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंहानी ही टीका केली आहे. ही राफेल विमाने हरियाणाच्या अंबाला एअरफोर्स स्टेशनवर उतरणार असून पुढच्या महिन्यात भारतीय वायुसेनेकडे त्यांना सुपुर्द करण्यात येणार आहे. अशातच दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निषाणा साधला आहे.
-----------------
मॉडर्नाची लस अंतिम टप्प्यात; किती असेल एका डोसची किंमत?
----------------
लस निर्मितीच्या प्रयत्नांना वेग; 'या' कंपन्या आहेत आघाडीवर
-----------------
दिग्विजय सिंह यांनी एकसोबत काही ट्विट करत म्हटले आहे की, अखेर राफेल फायटर विमाने भारतात दाखलही झाली आहेत. १२६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा निर्णय संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २०१२मध्ये निर्णय घेतला होता. यातील १८ राफेल विमाने वगळता सगळी विमाने भारतीय कंपनी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड बनवण्याचा करार करण्याचे नियोजन होते आणि हे आत्मनिर्भर होण्याचा संकल्प होता. त्यावेळी एका राफेल फायटर विमानाची किंमत ७४६ कोटी रुपये ठरविण्यात आली होती. परंतु, हा करार मोदी सरकारने नंतर फ्रान्सच्या कंपनीसोबत केला आणि १२६च्या ऐवजी केवळ ३६ विमाने खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

एका राफेलची किंमत ७४६ कोटी रुपये असताना चौकीदार महोदयांनी काँग्रेस पक्षाने संसद आणि संसदेच्या बाहेर मागणी करूनही आज पर्यंत राफेलची खरेदी किंमत जाहीर केली नाही. चौकीदारांनी आतातरी राफेल फायटर विमानांची किंमत जाहीर करावी. राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या मागणीनुसार १३६ राफेल फायटर विमानांची गरज होती ज्याला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने मान्यता दिली होती. पंरतु, मोदींनी १२६ ऐवजी केवळ ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव का दिला, हे न समजण्यासारखे असल्याचेही दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: digvijay singh attack on modi government asks for price of rafale fighter jet plane