Surgical Strike : ''दिग्विजय सिंहांच्या विधानावर सहमत नाही; भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Digvijay statement regarding surgical strike said Rahul Gandhi

Surgical Strike : ''दिग्विजय सिंहांच्या विधानावर सहमत नाही; भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास''

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी सर्जिकल स्ट्राईकसंदर्भात पुरावे मागितले. सिंह यांच्या या मागणीनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सैन्याने केलेल्या कामाच्या पुराव्याची गरज नाही. असे उत्तर दिले. (Digvijay statement regarding surgical strike said Rahul Gandhi )

दिग्विजय यांच्या वक्तव्याशी काँग्रेस किंवा त्यांचा काहीही संबंध नाही, असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सिंह यांनी केलेले विधान वैयक्तिक मत असू शकते. आमचे नाही. काँग्रेस आणि भारतीय लष्करावर आपला पूर्ण विश्वास आहे. भारतीय लष्कराने पुरावे देण्याची गरज नाही. असं देखील राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचली आहे. यादरम्यान सोमवारी दिग्विजय सिंह यांनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे कुठे आहेत? पुलवामा हल्ल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यावरुन देशात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा: Devendra Fadnavis : "बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेच्या विपरीत शिवसेनेची भूमिका त्यामुळे..."

दरम्यान, दिग्विजय सिंहांच्या विधानांशी सहमत नाही. भारतीय लष्करावर पूर्ण विश्वास. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.