भाजप नेत्यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले, ...बॉम्ब बनवणे सामान्य गोष्ट

Dilip Ghosh said that making bombs is a common thing in Bengal politics
Dilip Ghosh said that making bombs is a common thing in Bengal politicsDilip Ghosh said that making bombs is a common thing in Bengal politics

बंगालच्या राजकारणात बॉम्ब बनवणे (making bomb) सामान्य गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान बंगालचे भाजप नेते दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी सोमवारी (ता. २३) केले. भाजपचे उपाध्यक्ष आणि खासदार अर्जुन सिंह हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये परत गेले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. (Dilip Ghosh said that making bombs is a common thing in Bengal politics)

जे तत्त्वांच्या आधारे राजकारण करीत नाहीत त्यांचे भाजपमध्ये टिकणे कठीण आहे, असे दिलीप घोष म्हणाले. यावेळी पत्रकारांनी त्यांना आठवण करून दिली की, त्यांनीच अर्जुनवर यापूर्वी बॉम्ब बनवल्याचा (making bomb) आरोप केला होता. जर हे खरे असेल तर त्यांनी त्याला भाजपमध्ये का आणले? आम्ही अनेक लोकांचा समावेश केला आहे. राजकारणात बॉम्ब बनवणे ही बंगालमध्ये सामान्य गोष्ट आहे, असे दिलीप घोष (Dilip Ghosh) म्हणाले.

Dilip Ghosh said that making bombs is a common thing in Bengal politics
प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान; बलात्कार पीडितेबद्दल म्हणाल्या...

तृणमूलकडून जो येईल तो असाच असेल. याला सामोरे जाण्यासाठी कायदा आहे. ते जिथून येतात ते एकतर संकट निर्माण करतात किंवा इतरांना लक्ष्य करण्यासाठी त्रास निर्माण करतात. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावर अत्याचार वाढले. हे आपण पाहिले आहे. त्यांच्या तक्रारी मी संसदेतही मांडल्या आहेत. त्यांना जुळवून घेता आले नाही, हीच त्यांची समस्या आहे, असेही घोष (Dilip Ghosh) म्हणाले.

बंगालमध्ये काही वर्षांपासून हिंसक राजकारण दिसत आहे. राजकीय कार्यकर्त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना लक्ष्य करण्यासाठी देशी बॉम्बचा (bomb) वापर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपने २०२१ च्या बंगाल निवडणुकीत प्रचाराचा मोठा मुद्दा बनवला होता. पत्रकारांनी विचारले की, तो अजूनही गुन्हेगार (गुंडा) आहे का? यावर घोष म्हणाले, 'मला कळत नाही की गुंडाची व्याख्या काय आहे. काही लोकांच्या मते मी देखील एक गुंड आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com