
प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वादग्रस्त विधान; बलात्कार पीडितेबद्दल म्हणाल्या...
आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेल्या भोपाळच्या लोकसभा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी बलात्कार प्रकरणात वादग्रस्त विधान केले आहे. कार्यक्रमादरम्यान खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी रेल्वे अधिकाऱ्याचे कृत्य चुकीचे ठरवत पीडितेवर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच महिला रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वेचे एडीआरएम गौरव सिंह यांच्यावर बलात्काराचा (abuse) आरोप केला होता.
रेल्वेत अनुकंपा नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली एडीआरएमने आपल्याशी संबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला होता. एवढेच नाही तर नोकरी मिळाल्यावरही त्याने बलात्कार सुरूच ठेवला होता, असेही ती म्हणाली होती. खासदार साध्वी प्रज्ञा सिंह २१ मे रोजी ऑल इंडिया ट्रेन कंट्रोलर असोसिएशनच्या कार्यक्रमाला पोहोचल्या. येथे त्यांनी स्टेजवरूनच डीआरएमकडून एडीआरएमच्या गुन्ह्याची माहिती घेतली. तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीला चुकीचे म्हटले. महिलांनी लालसेपोटी असे कृत्य करू नये, असेही त्यांनी (Sadhvi Pragya Singh Thakur) सांगितले.
हेही वाचा: इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा
गौरव सिंहने सहकाऱ्याचे आमिष दाखवून शोषण (abuse) केले. परंतु, कुठेतरी त्या महिलेचीही चूक आहे. तुम्ही दीड वर्षानंतर तक्रार करीत आहात. मला वाटते ते चुकीचे आहे. माणूस म्हणून कुणालाही शिक्षा होऊ नये. लग्नानंतरही एडीआरएम महिलेचा छळ करीत असल्याचे मला समजले आहे. महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर प्रकरण उघडले, असेही खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
अनुकंपा नियुक्ती हा तुमचा हक्क
या प्रकरणात महिलेचाही दोष आहे. अनुकंपा नियुक्ती हा तुमचा हक्क होता. तुम्ही डीआरएमकडे जायचे, अधिकाऱ्यांकडे जायचे, लोकप्रतिनिधींकडे जायचे की आम्हाला विभागाकडून अशी लालूच दिली जात आहे. आम्ही ज्या संस्थेत काम करतो ती आमच्या आईसारखी आहे. जेव्हा आपण आपल्या संस्थेसाठी आपुलकीने काम करतो तेव्हा आपल्यालाही तितकीच आपुलकी मिळते. अशा स्थितीत आईची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) म्हणाल्या.
Web Title: Sadhvi Pragya Singh Thakur Bad Words About A Victim Of Abuse Bhopal Madhay Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..