
पश्चिम बंगालचे भाजपाचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांचा सावत्र मुलगा श्रीजय दासगुप्ता यांचा संशयास्पद मृत्यू झाला. श्रीजय दासगुप्ता याच्या आईचे नाव रिंकू मजूमदार असे आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू मजूमदार आणि दिलीप घोष यांचे लग्न झाले आहे. कुटुंबातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रींजय सोमवारी रात्री त्याच्या मित्रांसह आला होता.