
पोलिस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांच्या महसूल सेवेतील मुलाने मारहाणीचे दोन व्हिडिओ आज माध्यमातून उघड झाल्याने खळबळ उडाली. पहिला व्हिडिओ ७.१३ मिनिटाचा तर दुसरा ४.४७ मिनिटाचा आहे.
भोपाळ - पत्नीला बेदम मारहाण करणारे पोलिस महासंचालक (कायदा) पुरुषोत्तम शर्मा यांना पदावरून हटवले असून याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मुलानेच मंत्र्याला दिल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या बारा वर्षापासून पत्नीचा आपल्यावर संशय असल्यासे घरातच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, असे त्या पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे.
देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येथील पोलिस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांच्या महसूल सेवेतील मुलाने मारहाणीचे दोन व्हिडिओ आज माध्यमातून उघड झाल्याने खळबळ उडाली. पहिला व्हिडिओ ७.१३ मिनिटाचा तर दुसरा ४.४७ मिनिटाचा आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पोलिस पुरुषोत्तम शर्मा हे एका मैत्रिणीच्या घरी गेले होते. तेथे पत्नी प्रिया शर्मा देखील पोचल्या. त्यानंतर घरी आल्यावर दोघांत वाद झाला. त्यावेळी पुरुषोत्तम शर्मा यांनी पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी घरात काही जण होते आणि ते सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसतात. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुरुषोत्तम यांचे पुत्र पार्थ गौतम याने मध्य प्रदेशचे गृहमंत्री, राज्याचे पोलिस महासंचालक आदींना पाठवले.
जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा