Tinkesh Kaushik : दिव्यांगाची बेस कॅम्पपर्यंत धडक

शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलो तरी लहानसहान समस्येमुळे आपण खचून जातो.
Tinkesh Kaushik
Tinkesh Kaushiksakal

पणजी - शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलो तरी लहानसहान समस्येमुळे आपण खचून जातो. मात्र वयाच्या नवव्या वर्षी विजेच्या झटका लागल्यामुळे दोन्ही पाय आणि एक हात गमावलेल्या ‘ट्रिपल अँप्युटी’ या दिव्यांगाने जगातील सर्वात उंचीचे एव्हरेस्टचा बेस कॅम्पपर्यंत धडक मारण्याचा पराक्रम केला.

टिंकेश कौशिक असे या दिव्यांगाचे नाव असून त्याने ११ मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंतची सफर करून नवा विक्रम रचला. बेस कॅम्पपर्यंत जाणारा टिंकेश हा जगातील पहिला दिव्यांग आहे.

आपण ही कामगिरी ‘एव्हरेस्टरुपी’ उंच मानसिकतेमुळेच करू शकलो, असे कौशिक यांनी सांगितले. कौशिक हे गोव्यातील कारमोना-वार्का येथे मागील तीन वर्षापासून वास्तव्यास आहेत. मनुष्याला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी शारीरिक सदृढेपेक्षा मानसिक तयारी असणे गरजेचे आहे. माझी एव्हरेस्ट मोहीम खडतर होती.

पहिल्याच दिवशी, ही मोहीम शक्य होणार नाही, असा मनात सारखा विचार येत होता. कारण मला आरोग्याच्या समस्या उद्भवल्या, श्‍वास घेण्यास त्रास होत होता. परंतु न खचता मार्ग सुकर करत बेस कॅम्पर्यंत पोचलो, असे कौशिक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com