esakal | बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रणावरून मतभेद
sakal

बोलून बातमी शोधा

Nitish Kumar and Renudevi

बिहारमध्ये लोकसंख्या नियंत्रणावरून मतभेद

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पाटणा - बिहारमध्ये लोकसंख्या (Bihar Population) नियंत्रण विधेयक आणण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मतभेद प्रकर्षाने पुढे आले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी अशा कायद्याची बिहारमध्‍ये गरज नसल्याचे सांगितले आहे, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जायस्वाल (Sanjay Jaiswal) यांनी अशा कायद्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री रेणूदेवी (Renudevi) यांनीही नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे विधानाशी असहमती दर्शविली. (Disagreements Over Population Control in Bihar)

‘केवळ कायदा करून लोकसंख्या नियंत्रित राहणे अशक्य आहे. महिला जेव्हा साक्षर होतील, तेव्हा त्या जागरूक होतील आणि प्रजनन दर घटेल,’ असे नितीश कुमार म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचे हे विधान खोडून काढत रेणूदेवी यांनी महिलांपेक्षा पुरुषांनी जागरूक राहणे आवश्‍यक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार? शरद पवारांनी केला मोठा खुलासा

भाजप नेते सकारात्मक

लोकसंख्या नियंत्रण हा मुद्दा भाजपसाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे दिसत आहे. ‘सर्व धर्मांत कुटुंब नियोजनाची गरज आहे. यात सर्वांत मोठे आव्हान मुस्लिमांचे आहे. म्हणूनच आता कायद्याशिवाय पर्याय नसल्याचे भाजपच्या एका नेत्याने नाव उघड न करता सांगितले. नित्यानंद राय, गिरिराज सिंह व नितीश कुमार सरकारमधील सम्राट चौधरी हे कायद्याच्या बाजूने बोलत आहेत. यावरून सत्ताधारी आघाडीत मतभिन्नता दिसत आहे.

देशातील लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, ते पाहता लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या दिशेने राज्य सरकारांनी प्रभावी उपाय योजण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशाची गरज लक्षात घेता अन्य राज्यांनीही असा कायदा करावा.

- संजय जायस्वाल, भाजप प्रदेशाध्यक्ष, बिहार

loading image