National Recognition for Lt Col Sita Shelke from Ahilyanagar
Sakal
देश
Sita Shelke: केंद्र सरकारकडून सीता शेळकेंना आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार; अहिल्यानगरच्या लेफ्टनंट कर्नलचा गौरव!
Ahilyanagar Lt Colonel national Award: सीता शेळके यांना आपत्ती व्यवस्थापनात उल्लेखनीय योगदानासाठी केंद्र सरकारचा सन्मान
नवी दिल्ली: दोन वर्षांपूर्वी केरळच्या वायनाडमध्ये आलेला महापूर व भूस्खलनाच्या वेळी नागरी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर मानवीय मदत व आपत्ती निवारणाच्या मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या लष्करातील लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या यंदाच्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

