‘कालापानी’वरून वाद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर भारताने नवा नकाशा जारी केला आणि नेपाळबरोबरील जुना सीमावाद पुन्हा उफाळून आला. या नकाशात भारतीय भाग असल्याचे दाखविलेला कालापानी हा भाग आमचा असल्याचा नेपाळचा दावा आहे. भारताने मात्र हा पूर्वीपासून आमचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. 

काश्‍मीरला केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर भारताने नवा नकाशा जारी केला आणि नेपाळबरोबरील जुना सीमावाद पुन्हा उफाळून आला. या नकाशात भारतीय भाग असल्याचे दाखविलेला कालापानी हा भाग आमचा असल्याचा नेपाळचा दावा आहे. भारताने मात्र हा पूर्वीपासून आमचाच भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे वाद? भारताचा दावा 
    कालापानी हा उत्तराखंडमधील पिठोरगड जिल्ह्याचा हा एक हिस्सा
    सर्व उपनद्या जिथे एकत्र येतात, तिथून कालापानी नदी सुरु होते म्हणून तिथूनच सीमारेषा समजावी.
    करांबाबतची १८३० पर्यंत कागदपत्रे भारताच्या बाजूने
    १८७९ च्या नकाशातही हा भाग ब्रिटिशशासित भारताचा असल्याचे दाखविले आहे. 

नेपाळचा दावा
    सुदूर पश्‍चिम प्रदेशमधील दारचुला जिल्ह्याचा हा भाग. 
    बहुतेक सर्व उपनद्यांचे उगमस्थान असलेल्या लिपुलेख खिंड हे कालापानीचे उगमस्थान समजून तिथूनच सीमारेषा मानली जावी.
    लिपुगड या उपनदीच्या उगमापासून ते ही उपनदी नेपाळ सीमेवरील कालीनदीला जिथे येऊन मिळते, तो सर्व भाग आमचा.
    ५८ वर्षांपूर्वीपर्यंत वादग्रस्त भाग नेपाळचाच असल्याचे मानले जात होते. 

वादाची पार्श्‍वभूमी
    १९९६ मध्ये भारत आणि नेपाळमध्ये सीमावाद सोडविण्यासाठी महाकाली करार. यानंतर हा वाद अधिक ठळकपणे समोर आला. 
    २०१६ पर्यंत अनेक समित्या स्थापन होऊनही वादाबाबत अंतिम निर्णय नाही. 
    मार्च २०१७ मध्ये भारताच्या जवानांकडून एक नेपाळी नागरिक मारला गेल्यानंतर वाद चिघळला. 
    कालापानी हा भागातूनच नेपाळ, भारत आणि तिबेटची सीमा सुरु होते. 
    नेपाळचा दावा असलेल्या लिपुलेख खिंडीतून २०१५ पासून भारत-चीन व्यापार 

काही दावे
    १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर नेपाळचे तत्कालीन राजे महेंद्र यांनी हा भाग भारताला दिला. भारताने मात्र अतिरिक्त ६२ किमीचा भाग बळकावला, असा अहवाल नेपाळच्या पंतप्रधानांकडे सादर झाला आहे. 
    ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या विविध नकाशांमध्ये काली नदीचे वेगवेगळे उगमस्थान दाखविले आहे. यामुळेच भारत-नेपाळमध्ये वाद असून दोघांकडे आपापले दावे सिद्ध करणारे नकाशे आणि पुरावे आहेत. 
    भारत-चीन युद्धापासून (१९६२) हा भाग भारताच्याच ताब्यात आहे.

भौगोलिक बाजू
    हिमालयात उगम पावणाऱ्या महाकाली नदीची उपनदी असलेल्या कालापानी ही उपनदी.
    नेपाळ आणि भारताच्या सीमेवरून काली नदी वाहते.
    कालापानी खोऱ्यातील लिपुलेख खिंड हा कैलाश मानसरोवराकडे जाण्याच्या मार्गाचा एक भाग आहे. उत्तराखंडमधील भोतियास हा समुदायही तिबेटला जाण्यासाठी हाच मार्ग वापरतो.
    नेपाळ साम्राज्य आणि ब्रिटिश यांच्या १८१६ मध्ये झालेल्या सागौली करारानुसार काली नदी ही नेपाळची भारताबरोबरची पश्‍चिमेकडील सीमा आहे. या काली नदीला अनेक उपनद्या आहेत. या सर्व उपनद्या एकत्र येऊन कालापानी नदी तयार होते. 
    वादातील एकूण भागाचे क्षेत्रफळ : ३५ चौरस किमी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dispute on kalapani area