
नाशिक : अतिदुर्गम भागांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रम शाळा राबवल्या जातात. पण या आश्रम शाळांची अवस्था अन् तिथं पुरवलं जाणार जेवण याबाबत कायमच तक्रारी येत असतात. आता असाच प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील तब्बल ४४ आश्रम शाळांमध्ये जनावरंही खाणार नाहीत अशा निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवलं जात असल्याचं समोर आलं आहे. या आश्रम शाळांसाठी ज्या सेन्ट्रल किचनमध्ये जेवण तयार केलं जातं, तिथल्या भयानक कारभाराकडं अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.