दिल्लीचा ऑक्सिजन इतर राज्यांना द्या; मनीष सिसोदिया असं का म्हणाले?

manish sisodiya
manish sisodiyafile photo

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीमध्ये (Delhi ) काही दिवसांपूर्वी कोरोना स्थिती गंभीर बनली होती. ऑक्सिजन सुविधा, ऑक्सिजन सिलिंडर (oxygen) कमी पडत होते. पण, आता परिस्थिती आटोक्यात येत असल्याचं चिन्ह आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांनी याचे संकेत दिले आहेत. दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट १४ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तसेच दररोज हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली असून ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रिक टनवरुन ५८२ मेट्रिक टनपर्यंत कमी झाली आहे, असं सिसोदिया म्हणाले. (Divert surplus oxygen from Delhi quota to other states says Manish Sisodia)

पत्रकार परिषदेला संबोधित करताना सिसोदिया म्हणाले की, दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहिलं असून ऑक्सिजनचा जास्तीचा पुरवठा इतर गरजू राज्यांकडे वळवण्यास सांगितलं आहे. गेले १५ दिवस दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पॉझिटिव्हिटी रेट ३५ टक्क्यांपर्यंत गेला होता. याकाळात दररोज ८० हजार ते १ लाख कोविड-१९ टेस्ट करण्यात आले. दररोज २७ ते २८ हजार कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतलं जात होतं.

manish sisodiya
'मोदी सरकार इतकं असंवेदनशील कसं असू शकतं' : दिल्ली हायकोर्ट

सिसोदिया पुढे म्हणाले की, राज्यात कोरोनाचा प्रकोप आता कमी झाला आहे. रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. पॉझिटिव्हिटी रेट १४ टक्क्यांपर्यत कमी झाला आहे. तसेच दररोज हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यात येणाऱ्या रुग्णांची संख्या १० हजारापर्यंत कमी झाली आहे. सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही मोठी होती, पण आता ती कमी झाली आहे.

राज्यात काहीकाळ ऑक्सिजन पुरवठ्याची मागणी मोठी होती. दिल्लीला दिवसाला ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागायचा. केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाच्या पाठिंब्यामुळे राज्याला आता पुरेसा ऑक्सिजन मिळत आहे. दिल्लीची ऑक्सिजनची आवश्यकता सध्या ५८२ मेट्रिक टन आहे, त्यामुळे केंद्र सरकारने इतर गरजू राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा वळवावा, असं सिसोदिया म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com