देशांतर्गत विभागलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल गांधी
देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी

देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय - राहुल गांधी

नवी दिल्ली : मुस्लिम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी आक्षेपार्ह विधान केल्यानं आखाती देशातून भारतावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. भारतानं माफी मागावी अशी मागणी काही मुस्लिम राष्ट्रांनी केली आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. (Divided internally India becomes weak externally says Rahul Gandhi)

राहुल गांधी यासंदर्भात ट्विट केलं असून आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "देशांतर्गत दुभंगलेला भारत आता बाहेरुन कमकुवत झालाय. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेनं आपल्याला केवळ एकाकी पाडलेलं नाही, तर जागतिक स्तरावर भारताचं स्थानही खराब केलं आहे"

हेही वाचा: नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा प्रस्ताव नाही - RBI

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्हीवरील एका डिबेट शोमध्ये बोलताना पैगंबरांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचबरोबर दिल्ली भाजपचे मीडिया सेल प्रमुख नवीन जिंदाल यांनीही अशाच प्रकारच विधान केलं होतं. पण त्यांच्या या विधानावरुन जागतीक स्तरावर मोठं वादंग निर्माण झालं. आखाती देशानं या विधानावर आक्षेप घेत भारताला टार्गेट केलं आणि माफीची मागणी केली. जागतीक स्तरावरुन प्रतिक्रिया उमटायला लागल्यानंतर भाजपनं नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित करत त्यांची प्रथमिक सदस्यता रद्द केली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन देशभरातही मोठ्या प्रमाणावर टीका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर सडकून टीकेचा सूर उमटत आहे.

Web Title: Divided Internally India Becomes Weak Externally Says Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpRahul GandhiDesh news
go to top