नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा कुठलाही विचार नाही; RBIचं स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI

नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा प्रस्ताव नाही - RBI

नवी दिल्ली : भारतीय चलनावरील महात्मा गांधी यांची प्रतिमा बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारकडून नोटांवर गांधीजींची प्रतिमा बदलून इतर राष्ट्रपुरुषांची प्रतिमा लावण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा सध्या देशभरात सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर अनेकांनी विविध नावं सुचवली असून यासाठी लॉबिंग करायलाही सुरुवात केली आहे. (no proposal by RBI to make any changes in the existing currency and bank notes says)

रिझर्व्ह बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलं की, सध्याच्या चलनात आणि बँकेच्या नोटांमध्ये कुठलाही बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या आरबीआयकडे आलेला नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय चलनावर रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे छायाचित्र वापरण्याचा विचार करत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

हेही वाचा: शाळा १५ जूनला होणार सुरु; मास्कसक्ती नाही - वर्षा गायकवाड

दरम्यान, यापूर्वी डोबिवलीतील संकल्प प्रतिष्ठाननं सन 2010 साली आरबीआय आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना पत्रव्यवहार करत अशीच मागणी केली होती. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील फोटो भारतीय चलनवर यावा अशी मागणी केली होती.

अशा प्रकारे चलनावर विविध लोकांच्या प्रतिमा छपण्याची मागणी उचल खाण्याची शक्यता लक्षात घेता आरबीआयनंच स्वतः पुढे येत चलनावरील फोटो बदलण्याचा कुठलाही विचार नसल्याचं म्हटलं आहे.

Web Title: No Proposal By Rbi To Make Any Changes In The Existing Currency And Bank Notes Says Rbi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai NewsrbiDesh news
go to top