
अक्षता पवार
गंगटोक : ‘पाहण्याची क्षमता जितकी अधिक, निर्णय घेण्याची गती जितकी जलद, तितकीच रणभूमीवरील यशाची शक्यता अधिक,’ या तत्त्वावर आधारित भारतीय सैन्यदलाच्या वतीने घेण्यात आलेला पूर्व सिक्कीमच्या हिमालयातील उंच भागात ‘दिव्यदृष्टी’ हा आधुनिक तंत्रज्ञानयुक्त युद्धसराव नुकताच पार पाडला.