Diwali 2020: 'फटाके फोडू नका तर खावा', कर्नाटकात साजरी होतेय विशेष दिवाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chocklate crackers

कर्नाटकमध्ये दिवाळीनिमित्त चॉकलेट फटाक्यांसरखे विकले जात आहेत.

Diwali 2020: 'फटाके फोडू नका तर खावा', कर्नाटकात साजरी होतेय विशेष दिवाळी

बेंगळूरू: Diwali 2020- दिवाळी आली की बरेच जण दंग असतात ते फटाका फोडण्यात. त्यामध्ये रॉकेट, सुतळी बाँम्ब, लक्ष्मी तोटा आणि विविध फटक्यांचा समावेश असतो. संपूर्ण दिवाळीत फटाक्या जाळल्याने पर्यावरणाचंही मोठं नुकसान होतं. यावर्षी दिल्लीसह आसपासच्या इतर शहरांत फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. उत्तर प्रदेशातीलही काही शहरांत यावेळेस फटाके फोडण्यास बंदी घातली आहे.

अशातच कर्नाटकातून एक विशेष बाब समोर आली आहे. यामध्ये, 'या दिवाळीत फटाके फोडू नका तर ते खावा' अशी हाक दिली जात आहे. इथं चॉकलेट फटाक्यांच्या रुपात विकली जात आहेत, यामुळेच फटाके फोडू नका तर ते खावा असा सल्ला दिला जात आहे. या चॉकलेटची नावे रॉकेट, सुतळी बाँम्ब, लक्ष्मी तोटा अशी आहेत. हे सर्व चॉकलेट फटाक्यांसरखे विकले जात आहेत.

कोरोनामुळे कर्नाटकात फटाक्यांवर बंदी-
कर्नाटकात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडण्यास यावर्षी बंदी घातली आहे.  6 नोव्हेंबरला कर्नाटकात कोरोनामुळे फटाके जाळण्यावर बंदी घालण्यात आली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले की, या संदर्भातील आदेशाची लवकरच अंमलबजावणी केली जाईल.

Corona Updates: मागील 24 तासांत 50 हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

NGT चा ग्रीन फटाक्यांना ग्रीन सिग्नल-
देशातील इतर राज्यांतही फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी राजधानी दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एनजीटीने देशभरात फटाक्यांवर बंदी घातली होती, पण ज्या राज्यांमध्ये हवेच्या गुणवत्ता चांगली आहे तिथं 2 ग्रीन फटाके जाळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ग्रीन क्रॅकर्स म्हणजे काय? 
- 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने फटाक्यांना बंदी घातली आहे. तसेच फक्त ग्रीन क्रॅकर्सना परवानगी दिली आहे. यामुळे प्रदुषणात 30 टक्क्यांनी घट होते. 
- या ग्रीन क्रॅकर्सचे संशोधन आणि निर्मिती CSIR-NEERI च्या शास्त्रज्ञांनी कोर्टाच्या आदेशाने केली होती.
- ग्रीन क्रॅकर्स म्हणजे असे फटाके जे आकाराने लहान असतील तसेच कमी हानीकारक घटकांचे उत्सर्जन करणारे असतील. 
- ग्रीन क्रॅकर्समध्ये बंदी घालण्यात आलेले केमिकल्स म्हणजे लिथीअम, अर्सेनिक, बॅरियम आणि शिसे हे घटक असणार नाहीत. त्यांना Safe Water Releaser (SWAS) असंही म्हटलं जातं. 
- ग्रीन क्रॅकर्स हे दोन प्रकारात मिळतात. एक म्हणजे बॅरियम या केमिकल शिवाय आणि दुसरं म्हणजे कमी प्रमाणातील बॅरियमसह. 
- या दोन्ही प्रकारच्या ग्रीन क्रॅकर्समुळे जवळपास 30 ते 35 टक्के कमी प्रदुषण होते. ग्रीन क्रॅकर्स फक्त 125 डेसिबल इतकाच आवाज करतात असंही संशोधनात सिद्ध झालं आहे. इतर नेहमीचे फटाके हे 160 डेसिबलहून अधिक आवाज करतात. 
- बेरियम नायट्रेट हा प्रदुषण करणारा घटक ऍटम बॉम्बसारख्या फटाक्यांमध्ये वापरला जातो. 

(edited by- pramod sarawale)

Web Title: Diwali 2020 Chocolatier Has Come Concept Chocolates Crackers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top