Diwali 2025: ट्रम्प टॅरिफचा दिवाळी फराळाला फटका! परदेशातून मागणीत घट; महागाईनेही खिशाला कात्री

Trump Tariff Impact On Diwali: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर आयात शुल्क लावले आहेत. यामुळे अतिरिक्त आयात शुल्क लागणार असल्याने खिशाला कात्री बसत आहे.
Trump Tariff Impact On Diwali

Trump Tariff Impact On Diwali

ESakal

Updated on

बापू सुळे

मुंबई : भारतातून परदेशातही फराळाला माेठी मागणी असते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर ५० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे त्याचा फटका फराळ व्‍यवसायालाही बसत आहे. भारतातून अमेरिकेत तीन किलो फराळ मागवण्यासाठी कुरियर आणि जीएसटीसह ७,५०० रुपये मोजावे लागतात. त्यावर आणखी ५० टक्के अतिरिक्त आयात शुल्क लागणार असल्याने हा खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे फराळाच्या ऑर्डर घटल्याचे दिसून येते. यंदा त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी फराळाची दुकाने तसेच बचत गटांचे स्टॉल सजले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com