फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नाही; न्यायालयाचे महत्वाचे निर्देश

फटाक्यांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Ban on fire crackers in nagpur this diwali
Ban on fire crackers in nagpur this diwali Team eSakal
Updated on

दिवाळी जवळ आली असून, कोरोना महामारीनंतर लोक पहिल्यांदाच दिवाळी आनंदाने साजरी करू शकणार आहेत. त्यामुळे सर्वत्र यंदा आनंदाचं वाताववर आहे. त्यातच या दिवाळीत फटाक्यांच्या वापरावरून वेगवेळ्या चर्चा सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर पूर्णपणे बंदी (Ban on fire crackers) नसल्याचं स्पष्ट केलंय. फक्त काही घातक रसायणांचा वापर केलेल्या फटक्यांवरच बंदी असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय.

फटाक्यांवरील बंदीवरून सुरुअसलेल्या वेगवेळ्या वादविवादावर पडदा टाकत न्यायालयानं फटाक्यांवर पूर्णपणे बंदी नसेल, हे स्पष्ट केलं. केवळ ज्या फटाक्यांमध्ये बेरीयम सॉल्ट असेल, तसेच जे फटाके रसायनयुक्त असतील, अशाच फटाक्यांवर बंदी असणार असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलंय. उत्सवाच्या नावाखाली अशा फटाक्यांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, तसेच कोर्टानं बंदी घातलेल्या फटाक्यांचा वापर करण्याची परवानगी कोणीही देऊ शकत नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय.

Ban on fire crackers in nagpur this diwali
"आता बॅरिकेड्स हटवले, लवकरच तीनही कृषी कायदेही हटवले जातील"

त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वांना पून्हा एकदा फटाके विकत घेताना काळजी घ्यावी लागणार आहे. रसायनयुक्त फटाके हे पर्यापरणासाठी घातक ठरणारे असून, त्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com