

Cyber Police Warn Consumers Against Fake Diwali Shopping Websites, Lucky Draws and Unrealistic Discounts
esakal
दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या सणासुदीच्या काळात ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लक्ष्य करण्यासाठी सायबर भामट्यांनी बनावट वेबसाइट्सचा वापर सुरू केला आहे. नामांकित ब्रँडच्या नावाने हुबेहूब दिसणारी संकेतस्थळे तयार करून इलेक्ट्रॉनिक्स, कपडे आणि घरगुती वस्तूंवर ८० ते ९० टक्क्यांपर्यंत सवलतींचे आमिष दाखवले जात आहे. या माध्यमातून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यासोबतच त्यांची गोपनीय बँकिंग माहिती चोरण्याचा धोका आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.