esakal | Diwali Muhurat Trading 2020: सुख-समृद्धीसाठी आज आहे मुहूर्तावरचे ट्रेडींग; जाणून घ्या काय आहे वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

diwali

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडींग सत्राचे आयोजन केलं जातं.

Diwali Muhurat Trading 2020: सुख-समृद्धीसाठी आज आहे मुहूर्तावरचे ट्रेडींग; जाणून घ्या काय आहे वेळ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडींग सत्राचे आयोजन केलं जात आहे. या एका दिवशी एका तासाशिवाय शेअर मार्केट पूर्णत: बंद राहतं. असं म्हटलं जातं की, या प्रकारचे मुहूर्त ट्रेडींगमुळे व्यापारात पुढील वर्षभर धन आणि समृद्धी मिळते. आज BSE आणि NSE द्वारे दिवाळीच्या निमित्ताने एका तासाच्या विशेष मुहूर्तावर ट्रेडींग सत्राचे आयोजन केलं जात आहे.  

हेही वाचा - कंपनीने मोबाईल बदलून देण्यास दिला नकार; स्वत:लाच घेतलं जाळून

या वर्षी हे मुहूर्त ट्रेडींग संध्याकाळी 6.00 ते 6.08 वाजेपर्यंत होईल. नॉर्मल सेशनची वेळ संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत असेल. क्लोजिंग सेशन संध्याकाळी 7.25 ते 7.35 पर्यंत असेल. करंसी व कमोडीटी मार्केटमध्ये संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत मुहूर्त ट्रेडींग होईल. ब्लॉक डील सेशनचे टायमिंग संध्याकाळी 5.45 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल. असं म्हटलं जातं की, हा मुहूर्त म्हणजे अशी एक संधी आहे ज्यामध्ये व्यापारातील समुदायामध्ये धन आणि समृद्धीची देवता लक्ष्मीचे पूजन केलं जातं. सोबतच नव्या वर्षाच्या प्रारंभाचा सोहळाही साजरा केला जातो. 

हेही वाचा - Corona Update : देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू

आज दिवाळीचे मुहूर्त ट्रेडींग सेशन
मुहूर्त ट्रेडींग संध्याकाळी 6.00 ते 6.08 वाजेपर्यंत 
नॉर्मल सेशन संध्याकाळी 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत 
क्लोजिंग सेशन 7.25 ते 7.35 वाजेपर्यंत 
करंसी व कमोडिटी मार्केट 6.15 ते 7.15 वाजेपर्यंत