

Kanpur Forest Department deploys special teams to prevent illegal owl hunting and wildlife trafficking during Diwali.
esakal
कानपूर दिवाळीच्या काळात तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली होणारी घुबडांची शिकार व अवैध तस्करी रोखण्यासाठी कानपूर वन विभागाने संपूर्ण जिल्ह्यात हाय अलर्ट जारी केला आहे. विभागीय वनाधिकारी (डीएफओ) आकांक्षा जैन यांच्या निर्देशानुसार, कानपूर शहरासह बिधनू, बिल्हौर आणि घाटमपूर या भागांत विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. संशयित पक्षी बाजारपेठा आणि शिकारींच्या संभाव्य ठिकाणांवर दिवाळीपर्यंत नियमित छापे टाकण्यात येणार आहेत.