डिलिमिटेशन विधेयकाबाबत DMK ची भूमिका अखेर स्पष्ट, भाजपच्या अडचणी वाढणार? नेमकं काय घडतंय?

DMK's Stand on Delimitation Bill : केद्रातील भाजप सरकार पुढील आठवड्यात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
 MK Stalin on Delimitation Bill

MK Stalin on Delimitation Bill

esakal

Updated on: 

मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असताना तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेतील तामिळनाडूचा सध्याचा ७.१८ टक्के जागांचा वाटा कोणत्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. केंद्रातील भाजप सरकार पुढील आठवड्यात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पुन्हा संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.

Loading content, please wait...