वेल्लोरवर 'द्रमुक'चा झेंडा; कथीर आनंद विजयी

वृत्तसंस्था
Friday, 9 August 2019

तमिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीमध्ये "द्रमुक'चे उमेदवार डी. एम. कथीर आनंद हे 8 हजार 141 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

चेन्नई : तमिळनाडूतील वेल्लोर लोकसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीमध्ये "द्रमुक'चे उमेदवार डी. एम. कथीर आनंद हे 8 हजार 141 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. कथीर यांनी प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुकच्या ए. सी. शानमुगम यांचा पराभव केला.

आज सकाळीच मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर कथीर आनंद हे दुसऱ्या स्थानावर होते; पण शेवटच्या क्षणी त्यांनी आघाडी घेत विजय मिळवला. वेल्लोर येथेही 18 एप्रिल रोजीच मतदान होणार होते; पण त्याआधीच या भागातून मोठ्या प्रमाणावर पैसे जप्त करण्यात आल्याने येथील निवडणूक ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कथीर आनंद यांना 4 लाख 76 हजार 194 एवढी मते मिळाली, तर शानमुगम यांना 4 लाख 67 हजार 006 एवढी मते पडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DMKs Kathir Anand wins Vellore Lok Sabha election