IB Notice CAPF
IB Notice CAPFeSakal

CAPF : युनिफॉर्ममध्ये व्हिडिओ आणि रील्स बनवू नका, केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सूचना; काय आहे कारण?

IB : केंद्रीय गुप्तचर विभागाने हे निर्देश जारी केले आहेत.

केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सोशल मीडिया वापराबाबत नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत. वाढत्या हनी-ट्रॅपिंग आणि हॅकिंगच्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या जवानांनी गणवेशात व्हिडिओ किंवा रील्स पोस्ट करू नयेत असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

यासोबतच, फोटो पोस्ट करणे किंवा सोशल मीडियावर स्वतःची वैयक्तिक माहिती शेअर करणे याबाबत देखील निर्देश देण्यात आले आहेत. कित्येक जवान आपल्या युनिफॉर्ममध्ये व्हिडिओ पोस्ट करतात, आणि अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग देखील करतात असं आढळून आल्यामुळे ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

IB Notice CAPF
CRPF Salary : CRPFमध्ये नोकरी मिळाल्यास किती असेल पगार व कोणत्या सुविधा मिळतील? जाणून घ्या सविस्तर

केंद्राच्या गुप्तचर विभागाने विविध प्रकारची निमलष्करी दले आणि पोलीस दलातील जवानांना यासंबंधी नोटीस दिली आहे. या नियमांची तातडीने आणि गांभीर्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश सीआरपीएफने आपल्या जवानांना दिले आहेत. तसेच, हे नियम फॉलो न करणाऱ्या जवानांवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही यात म्हटलं आहे. (National News)

हनीट्रॅपचं प्रमाण वाढलं

देशातील जवान किंवा सरकारी अधिकाऱ्यांचं हनीट्रॅप होण्याचं प्रमाण वाढल्यामुळे हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याच महिन्यात विशाखापट्टणम येथे तैनात असणाऱ्या सीआयएसएफ जवानाला हनीट्रॅप करण्यात आलं. तो एका पाकिस्तानी महिला एजंटच्या संपर्कात होता, आणि मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती त्याने शेअर केली होती.

सोशल मीडियावरील फ्रेंड्स

सोशल मीडियावर नवीन फ्रेंड्स जोडताना एखाद्या अकाउंटबाबत पूर्ण खात्री करून मगच ते आपल्या लिस्टमध्ये अ‍ॅड करावेत; असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

IB Notice CAPF
MEA Honeytrap : आणखी एक हनीट्रॅप! परराष्ट्र मंत्रालयाचा कर्मचारी 'अंजली'च्या जाळ्यात; G20 परिषदेच्या गोपनीय फाईल्स केल्या शेअर

'अशा' व्हिडिओंना बंदी

युनिफॉर्ममध्ये बनवलेल्या रील्ससोबतच, प्रतिबंधित भागातील व्हिडिओ शेअर करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सोबतच, सीमा भागातील व्हिडिओ, प्रतिबंधित भागातील व्हिडिओ किंवा सीमेवर तैनात जवानांचे व्हिडिओ पोस्ट करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिल्ली कमिश्नरांची नोटीस

दिल्ली पोलीस कमिश्नर संजय अरोरा यांनीदेखील एका स्वतंत्र नोटीसद्वारे जवानांना आणि पोलिसांना निर्देश दिले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीबाबत, अंडर ट्रायल व्यक्तीबाबत किंवा संवेदनशील विषयांबाबत पोस्ट किंवा कमेंट करणे टाळावे असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

IB Notice CAPF
India-China Dispute: हजारो सैनिक, 100 रणगाडे अन्… चीन सीमेवर भारताने केली होती अशी तयारी, अहवालात खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com