युक्रेनमधील भारतीयांना सरकारचे आवाहन; थेट सीमेवर पोहोचू नका, तर...

Arindam Bagchi
Arindam BagchiArindam Bagchi

नवी दिल्ली : युक्रेनमधील संघर्षग्रस्त भागातील भारतीय विद्यार्थ्यांनी देशाच्या पश्चिमेकडे जाण्याचा प्रयत्न करावा. तसेच जवळच्या शहरांमध्ये राहावे. थेट सीमेवर पोहोचू नका, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणि एमईएने सोमवारी (ता. २८) केले. अधिकाऱ्यांशी समन्वय साधल्यानंतरच शेजारच्या पोलंड, हंगेरी, स्लोव्हाकिया, रोमानिया आणि मोल्दोव्हामध्ये जाण्यासाठी सीमेवर जावे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) यांनी पत्रकारांना सांगितले. (Government appeals to Indians in Ukraine)

रशियाने पूर्व युरोपीय राष्ट्रावर हल्ला करण्यापूर्वी ८,००० हून अधिक भारतीयांनी युक्रेन सोडले आहे. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत सहा निर्वासन फ्लाइट्समध्ये आतापर्यंत १,३९६ विद्यार्थी भारतात पोहोचले आहेत. पुढील २४ तासांत आणखी तीन उड्डाणे नियोजित आहेत. दोन बुखारेस्ट ते मुंबई आणि दिल्ली तर तिसरी बुडापेस्ट ते दिल्ली, असेही, अरिंदम बागची यांनी सांगितले.

Arindam Bagchi
भारताला मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही; भूमिका केली स्पष्ट

राजधानी कीव शहरात कर्फ्यू नाही. लोकांना तेथून बाहेर पडण्याची परवानगी आहे. भारतीयांनी कीव रेल्वे स्टेशनवर जावे. तेथून ते पश्चिम सीमेकडे ट्रेन घेऊ शकतात. युक्रेनियन अधिकारी कीवहून मोफत ट्रेन चालवत आहेत, असे एमईएच्या प्रवक्त्याने सांगितले. कीवमध्ये युद्ध केले असले तरी, रशियाच्या पूर्वेकडील सीमेवर प्रथम तीव्र लढाई सुरू झाली. जिथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दोन तुटलेल्या भागांना स्वतंत्र म्हणून मान्यता दिली आहे. पूर्व युक्रेनमध्ये (Ukraine) असलेल्या भारतीयांनी पश्चिम सीमेवर जाण्याचा प्रयत्न करावा, असे एमईएने म्हटले आहे.

चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये

चार केंद्रीय मंत्री व्हीके सिंग पोलंडला, किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे रोमानिया आणि मोल्दोव्हाला भारतीयांना बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या (Ukraine) शेजारी राष्ट्रांमध्ये जात आहेत.

Arindam Bagchi
युक्रेनियन अधिकाऱ्यांकडून भारतीयांशी भेदभाव; मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप

कृपया काळजी करू नका

उड्डाणे ही अडचण नाही. कृपया काळजी करू नका. एकदा तुम्ही युक्रेनची सीमा ओलांडली की, आम्ही अधिक उड्डाणे सुनिश्चित करू. भारतीयांना सुरक्षितपणे युक्रेनची (Ukraine) सीमा ओलांडता यावी यासाठी आम्ही चिंतीत आहो, असे ची मुख्य चिंता आहे, असे अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com