Russia Ukraine crisis : भारताला मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही; रशियाचे नाव न घेता भूमिका केली स्पष्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harshavardhana Shringala

भारताला मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही; भूमिका केली स्पष्ट

युक्रेनच्या संकटावर भारताची भूमिका ठाम आहे. या प्रकरणी सर्व संबंधितांशी एकमेकांशी संपर्कात राहिले पाहिजे. भारताला मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही (India does not accept loss of human life), हे निदर्शनात आणून दिले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावावर भारताच्या भूमिकेचा संदर्भ देत परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला (Harshavardhana Shringala) यांनी सांगितले.

भारताने शुक्रवारी रशियाच्या युक्रेनवरील (Ukraine) आक्रमणाचा निषेध करणाऱ्या ठरावावर मतदान करण्याचे टाळले. परंतु, नवी दिल्लीने राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करण्याचे आवाहन करताना हिंसाचार आणि शत्रुत्व त्वरित बंद करण्याचे आवाहन केले होते. आम्ही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत घडामोडींवर मनापासून खेद व्यक्त करतो. आम्ही हे देखील सांगितले आहे की, मानवी जीवनाचे नुकसान मान्य नाही, असे हर्षवर्धन श्रृंगला (Harshavardhana Shringala) म्हणाले.

हेही वाचा: Ukraine : वरुण गांधींचा घरचा अहेर; सरकारला करून दिली आठवण

आम्ही असेही म्हटले आहे की कूटनीती आणि संवाद हाच पर्याय आहे. सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. आम्ही सर्व बाजूंच्या संपर्कात आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी बोलले आहेत. परराष्ट्र मंत्री या प्रकरणाशी संबंधित संवादकांच्या संपर्कात आहेत, असेही श्रृंगला (Harshavardhana Shringala) म्हणाले.

सर्व संबंधितांशी संपर्क साधला पाहिजे

रविवारी रशिया (Russia) आणि युक्रेनच्या राजदूतांची स्वतंत्रपणे भेट घेतली. भारत हा एक असा देश आहे ज्याचे हित त्या प्रदेशाशी निगडीत आहे. त्या क्षेत्रात आमचे मित्र देश आणि भागीदारी आहेत. या प्रकरणी आपण सर्व संबंधितांशी संपर्क साधला पाहिजे, असेही परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी सांगितले.

Web Title: India Does Not Accept Loss Of Human Life The Role Played Is Clear Harshavardhana Shringala Russia Ukraine War

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..