LPG Cylinder: रक्षाबंधनाला ७५० रुपये किमतीत मिळणारं LPG सिलेंडर नव्या रुपात, जाणून घ्या माहिती

एलपीजी सिलेंडर ७५० रुपयांत मिळणार असल्याच्या चर्चांना बाजारात उधाण आलं आहे. आपल्या माहितीसाठी हे सिलेंडर लोखंडी एलपीजी सिलेंडर नसून कंपोजिट सिलेंडर असणार आहे.
clear your confusion on rakshabandhan offer on LPG cylinder
clear your confusion on rakshabandhan offer on LPG cylinderesakal

इंडियन ऑईलनं ग्राहकांसाठी एक खास सिलेंडर मागल्या वर्षी काढलं होतं. हे सिलेंडर कंपोजिट सिलेंडर आहे. रक्षांबंधनाच्या दिवशी एलपीजी सिलेंडर ७५० रुपयांत मिळणार असल्याच्या चर्चांना बाजारात उधाण आलं आहे. आपल्या माहितीसाठी हे सिलेंडर लोखंडी एलपीजी सिलेंडर नसून कंपोजिट सिलेंडर असणार आहे. (clear your confusion on rakshabandhan offer on LPG cylinder)

कंपोजिट सिलेंडर म्हणजे नेमकं काय ?

कंपोजिट सिलेंडर तीन स्तरांनी बनलेलं आहे. यात सर्वात पहिला स्तर हाय डेंसिटी पॉलीइथिलीनचा थर आहे. आतमधील या थरावर पॉलीमरपासून बनलेल्या फायबर ग्लासचा कोट आहे. त्याच्या बाहेरील भाग एचडीपीआयने (HDPI)ने बनवला आहे. संपूर्ण सुरक्षेच्या दृष्टीने या सिलेंडरची रचना करण्यात आली आहे. LPG कंपोजिट सिलेंडर स्टिलने बनलेले आहे. त्यामुळे हे सिलेंडर वजनाने हलके असते.

तसेच हे सिलेडर २०२१ मध्ये नुकतंच बाजारात आलं होतं तेव्हा १० किलो वजनाच्या सिलेंडरची किंमत ३३५० रुपये एवढी होती. मात्र हे सिलेंडर यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी ७५० रुपये किमतीत मिळणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांना शंका होती कि १४ किलो वजनाचे एलपीजी सिलेंडर दहा किलो करून ७५० रुपये किमतीत दिलं जातंय तर हे मुळात चुकीचं आहे. खरं तर ७५० रुपये किमतीला मिळणारं हे लोखंडी एलपीजी सिलेंडर नसून एलपीजी कंपोजिट सिलेंडर असणार आहे. हे सिलेंडर ५ किलो आणि १० किलो अशा दोनच वजनात असतं.

clear your confusion on rakshabandhan offer on LPG cylinder
LPG Latest Price: रक्षाबंधन ठरतोय लकी ! गृहिणींना दिलासा; ७५० रुपयात मिळणार सिलेंडर

दहा किलो वजन असणाऱ्या सिलेंडरचे शहरानुसार दर

  • दिल्ली - 750 रुपये

  • मुंबई - 750 रुपये

  • कोलकाता - 765 रुपये

  • चेन्नई - 761 रुपये

  • लखनऊ - 777 रुपये

  • जयपुर - 753 रुपये

  • पटना - 817 रुपये

  • इंदौर - 770 रुपये

  • अहमदाबाद - 755 रुपये

  • पुणे - 752 रुपये

  • गोरखपुर - 794 रुपये

  • भोपाल - 755 रुपये

  • आगरा - 761रुपये

  • रांची - 798 रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com