esakal | तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?
sakal

बोलून बातमी शोधा

tricolour1.jpg

ध्वज फडकवताना काही नियम पाळावे लागतात. शिवाय आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मानही राखावा लागतो. 

तिरंगा फडकवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- 26 जानेवारी 2002 मध्ये भारतीय ध्वज संहितेत दुरुस्ती करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतर भारतीय नागरिकांना आपल्या घरी, कार्यालय, कंपनी आणि इतर संस्थामध्ये केवळ राष्ट्रीय दिवशीच नाही, तर कोणत्याही दिवशी विना अडथळा ध्वज फडकवण्याची परवानगी मिळाली. मात्र, ध्वज फडकवताना काही नियम पाळावे लागतात. शिवाय आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मानही राखावा लागतो. 

- राष्ट्रीय ध्वजाचा सांप्रदायिक लाभ, पडदा किंवा वस्त्रांच्या रुपात उपयोग केला जाऊ शकत नाही.

-हवामानाचा प्रभाव न पडता ध्वज सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत फडकवला जाऊ शकतो. रात्री झेंडा खाली उतरवला जातो.

-तिरंगा जमीन किंवा पाण्याशी स्पर्श करु नये याची काळजी घ्यावी. शिवाय खराब झालेला किंवा तिरंग्याचा कोणताही भाग जळाला असल्यास तो ध्वज वापरु नये.

-राष्ट्रीय ध्वज हा सूती किंवा खादीपासून बनवलेला असावा, झेंड्याची लांबी आणि रुंदी 3:2  च्या प्रमाणात असावी. 

- तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करता येत नाही. कोणी तिरंग्याच्या कपड्याचा वापर करत असेल तर तो अवमान ठरेल. तिरंग्याचा रुमाल म्हणूनही वापर करता येणार नाही. 

- तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिलेली असू नयेत. टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट म्हणून तिंरग्याचा वापर करु नये. याशिवाय रेल्वे, गाडी किंवा विमानाचा वरचा भाग झाकण्यासाठी ध्वजाचा वापर करु नये. 

-फडकविण्यात येणारा तिंरगा फाटलेल्या, मळलेल्या वा चुरगळलेला स्थितीत असू नये. शिवाय तिरंग्याचा केशरी रंग खाली नाही ना यात्री खातरजमा करावी.

-तिरंगा एखाद्या कार्यक्रमातील मंचावर फडकावला असल्यास, वक्ता भाषण करत असल्याच्या उजव्या बाजूला ध्वज असावा. तिरंगा झेंडा इतर कोणत्याही झेंड्यापेक्षा उंचीवर असावा. शिवाय इतर ध्वज किंवा पताका तिरंग्याबरोबर किंवा त्याच्यापेक्षा उंचीवर असू नयेत.

-तिरंग्याचा व्यावसायिक वापर करता येणार नाही. तिरंग्याचा अपमान केल्यास किंवा तिरंग्याबाबत अवमानकारक टिप्पणी केल्यास तीन वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

-तिरंग्याचा वापर मृतदेहाभोवती लपेटण्यासाठी करता येणार नाही. फक्त शहीदांच्या मृतदेहाभोवती तिंरगा लपेटला जाऊ शकतो.

-तिरंगा अर्ध्यावर फडकवू नये. सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे. काही विशिष्ठवेळी सरकारच्या आदेशानुसार झेंडा अर्ध्यावर आणला जातो. 

- राष्ट्रीय ध्वज शैक्षणिक संस्थामध्ये प्रेरणा देण्यासाठी फडकावला जाऊ शकतो.