National Flag: तिरंग्या आधीचे ‘हे’ पाच राष्ट्रध्वज तुम्हाला माहिती आहेत का ?

आत्ताच्या राष्ट्रध्वजापूर्वी भारतात पाच राष्ट्रध्वज येऊन गेले
National Flag
National Flagesakal

राष्ट्रध्वज ही ज्या त्या देशाची ओळख असते. भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असेही म्हणतात. आत्ताचा भारताचा तिरंगा केशरी,पांढरा आणि हिरवा या तीन रंगांचा असून यामध्ये निळ्या रंगाचे अशोकचक्र देखील आहे. मात्र या राष्ट्रध्वजापूर्वी भारतात पाच राष्ट्रध्वज येऊन गेले. पारतंत्र्यापासून स्वातंत्र्यापर्यंत भारतात राष्ट्रध्वज बदलत गेले. (National Flag)

हे होते भारताचे पाच राष्ट्रध्वज

1) पहिला राष्ट्रध्वज 1906 साली स्वीकारला होता. त्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगाचे तीन पट्टे, मध्यभागी 'वंदे मातरम्' हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळं असा हा झेंडा होता. 7 ऑगस्ट 1906 कलकत्ता येथे हा झेंडा फडकवला गेला.

2) भारताचा दुसरा झेंडा तर चक्क जर्मनी मध्ये फडकला होता. मदामा कामा यांनी 1907 साली आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत हा झेंडा फडकवला होता. झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता. तर केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सूर्य होते, तर हिरव्या पट्टयावर 8 तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांचं प्रतीक मानले जात होत. या तिरंग्याच्या मधल्या पट्ट्यावर ‘वंदे मातरम्’ लिहिल होत.

3) भारतात होमरुल ( Homerule) चळवळी दरम्यान अँनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी 1917 साली तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावर पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पद्धतीने होते. आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच या झेंड्यावर सात तारे काढले होते.

National Flag
दिवसा- रात्री देखील तिरंगा फडकवता येणार; केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल

4) 1921 मध्ये आंध्रप्रदेश येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात पिंगली व्यंकय्या यांनी एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. यामध्ये लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं ते प्रतीक होतं. त्यानंतर गांधीजींच्या सांगण्यानुसार यामध्ये पांढरा पट्टा देखील समाविष्ट करण्यात आला. शिवाय देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं होतं.

5) भारतीय काँग्रेस पक्षाने 1931 मध्ये केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. या झेंड्याने रंगांचा धर्माशी असलेला अर्थ काढून टाकला होता.

हाच झेंडा पुढे भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात घटना समितीने एक बदल करून स्वीकारला आणि भारताच्या झेंड्यात चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं. अशाप्रकारे अखेर भारताला सर्वसमावेशक असा राष्ट्रध्वज मिळाला.

National Flag
Independence Day: 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com