टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Car Accident News कार टँकरला धडकून झालेल्या भीषण अपघातात ३८ वर्षीय डॉ़क्टरस त्याची डॉक्टर पत्नी आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला.
Rajasthan Accident News

Rajasthan Accident News

Esakal

Updated on

राजस्थानच्या बारां जिल्ह्यात कवाई अटरू मार्गावर मंगळवारी भीषण अपघात झाला. या अपघातात डॉक्टर दाम्पत्यासह त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झालाय. कार आणि बल्करची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. अपघात इतका भीषण होता की कारमध्ये चारही जण अडकून पडले होते. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने चौघांना बाहेर काढून रुग्णालयात नेले. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com