'...तर महिला डॉक्टरवर बलात्कार करू'

वृत्तसंस्था
मंगळवार, 31 मार्च 2020

देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये एका सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी महिला डॉक्टरला घर रिकामे करण्यासाठी बलात्काराची धमकी दिली आहे.

भुवनेश्वर (ओडिशा): देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्ये एका सोसायटीच्या पदाधिकाऱयांनी महिला डॉक्टरला घर रिकामे करण्यासाठी बलात्काराची धमकी दिली आहे. संबंधित महिला डॉक्टरने याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

जवानाने मोबाईलवरून घेतले चिमुकल्याचे अंत्यदर्शन...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका महिला डॉक्टरवर घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.  घर रिकामे केले नाही तर बलात्कार करू, अशी कथितरित्या धमकी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्याची तक्रार महिला डॉक्टरने दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सूरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त अनुप कुमार साहो यांनी दिली. दरम्यान, महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करत सोसायटीकडूनही महिला डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Video : डॉक्टर अधिक्षकचा रुग्णालयात सुटला कंट्रोल अन्...

महिला डॉक्टरने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 'मी, डॉक्टर असून सध्या मी करोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करत आहे. माझ्यामुळे सोसायटीत कोरोना व्हायरस पसरेल, अशी भिती सोसायटीमधील रहिवाशांना वाटत आहे. घर खाली करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून त्रास सुरू आहे. शेवटी घर रिकामे केले नाही तर बलात्कार करू, अशी धमकी दिली गेली. पण, बलात्काराची धमकी दिल्यानंतर भीतीपोटी तक्रार दाखल करत आहे.

तुम्ही पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor lady working on corona patient society member said to vacant flat else will rape