Video : डॉक्टर अधिक्षकचा रुग्णालयात सुटला कंट्रोल अन्...

वृत्तसंस्था
Monday, 30 March 2020

पाकिस्तानमधील एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित डॉक्टरला चिकित्सक अधिक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

कराची : पाकिस्तानमधील एका डॉक्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित डॉक्टरला चिकित्सक अधिक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये खुर्चीवर एक व्यक्ती बसली असून, त्याच्यासमोर काळ्या रंगाचे कपडे घातलेली महिला बसलेली दिसत आहे. जेव्हा ही महिला बाहेर जाण्यासाठी उभी राहते तेव्हा ती व्यक्ती तिच्याजवळ येऊन तिला जबरदस्तीने जवळ घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडिओमधील व्यक्ती डॉक्टर असून,  डॉ. फैयाज खोखर असे नाव आहे. ही व्यक्ती गुजरांवालातील हॉस्पिटलमध्ये एमएस पदावर कार्यरत होती. या डॉक्टरने महिलेचं लैंगिक शोषण केले असून, त्याला या प्रकारानंतर त्याच्या चिकित्सक अधिक्षक पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे.'

'लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल?'

संबंधित व्हिडिओ पाकिस्तानातील सदफ यासिर खान नावाच्या महिला पत्रकाराने ट्विट केला आहे. महिला पत्रकाराच्या ट्विटला गुजरावाला येथील डेप्युटी कमिश्नरने ट्विट करून रिप्लाय दिला की, या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून, बडतर्फ करण्यात आले आहे.

Video:नवऱ्याच्या वर्क फ्रॉम होमला वैतागली बायको...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor shameful act with woman in hospital in pakistan