शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला टॉवेल अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

एका महिलेच्या पोटामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान पोटात टॉवेल राहिला. महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. पण, महिलेची प्रकृती सध्या गंभीर आहे.

गया (बिहार): एका महिलेच्या पोटामध्ये शस्त्रक्रियेदरम्यान पोटात टॉवेल राहिला. महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर टॉवेल काढण्यात आला. पण, महिलेची प्रकृती सध्या गंभीर आहे. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचे धक्कादायक उदाहरण समोर आल्यामळे खळबळ उडाली आहे.

Video: गुलाबजाम किती खाल्ले मोजा बरं...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मीरा देवी (वय 21) नावाच्या महिलेची शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर पोटात दुखू लागल्यामुळे डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचे सांगून 29 जुलै रोजी शस्त्रक्रिया केली. पण, शस्त्रक्रिया केल्यानंतर पोटाचे दुखणे अधिकच वाढले. दिवसेंदिवस पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे पुन्हा दुसऱया डॉक्टरांकडे नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी सीटीस्कॅन करण्याचा निर्णय घेतला. अहवाल हाती आल्यानंतर पोटामध्ये वस्तू असल्याचे आढळून आले. पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून टॉवेल काढण्यात आला. पण, सध्या महिलेची प्रकृती गंभीर आहे.

लग्नानंतर नवरीने 'असेच' रडायला हवे...

महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले की, 'गया शहरातील आनंदी माई मोर जवळील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी गेलो होतो. 29 जुलै रोजी डॉक्टरांनी ऑपरेशन केले. पण ऑपरेशननंतर त्रास कमी होण्याऐवजी वाढला होता. पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातून टॉवेल काढला आहे. 29 जुलै रोजी ज्या डॉक्टरने ऑपरेशन केले आहे, त्या डॉक्टरविरोधात कारवाई करणार आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor left towel in patients stomach at bihar

Tags
टॉपिकस
Topic Tags: