esakal | लग्नानंतर नवरीने 'असेच' रडायला हवे...
sakal

बोलून बातमी शोधा

bride crash course for crying while going to groom home

लग्नानंतर सासरी जाताना नवरीचे रडतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हसतात तर खिल्लीही उडवली जाते. पण, लग्नानंतर नवरीने कसे रडावे, कसे रडू नये? याबाबत एक कोर्स सुरू झाला आहे.

लग्नानंतर नवरीने 'असेच' रडायला हवे...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश): लग्नानंतर सासरी जाताना नवरीचे रडतानाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हसतात तर खिल्लीही उडवली जाते. पण, लग्नानंतर नवरीने कसे रडावे, कसे रडू नये? याबाबत एक कोर्स सुरू झाला आहे. या अभ्यासक्रामासाठी अनेकजण प्रवेश घेत असल्यामुळे चर्चेत आला आहे. भोपाळमध्ये राधिका राणी यांनी सात दिवसांचा क्रॅश कोर्स सुरू केला असून, अनेकजण विवाहापूर्वी प्रवेश घेऊ लागले आहेत.

...म्हणून 80 वर्षांत कधी केस कापले ना धुतले

लग्नासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. नवरीच्या मेकअपचाही खर्च मोठा असतो. पण, विवाह समारंभ पार पडल्यानंतर नवरी सासरी जायला निघते. यावेळी नवरीसह तिच्या नातेवाईकांना रडू कोसळते. अनेकजण ओक्साबोक्सी रडतात. रडण्याचा प्रसंग व्हिडिओ, मोबाईलमध्ये कैद होतो. अनेकांचे रडण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खिल्ली उडवली गेली आहे. पण, या वेळी नवरीने कसे रडावे, याचे भान असायला हवे. रडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. रडण्याच्या पद्धतींचा कोर्स आहे. कोर्स केल्यानंतर कसे रडावे, हे समजणार आहे. राधीका राणी यांनी सात दिवसांचा कोर्स सुरू केला आहे. सात दिवसांच्या कोर्समध्ये रडण्याविषयी शिकवले जाणार आहे. कोर्स सुरू केल्यानंतर अनेकांनी माझी चेष्टा केली होती. पण, आता या कोर्सची चर्चा राज्यात पसरली असून, अनेकजण प्रवेशासाठी विचारणा करत आहेत, असे राधिका राणी यांनी सांगितले.

धर्मेंद्र म्हणाले; योगायोग! माझ्या अंगणात मोरनी आली पण...

राधिका राणी म्हणाल्या, 'आपल्या आई-वडिलांचे घर सोडून सासरी निघालेल्या नवरीकडे पाहून सर्वांच्याच भावना अनावर होतात. त्या क्षणी मनावर व भावनांवर कसा ताबा ठेवायचा याचेही मार्ग सांगते. अनेकदा विचित्र पद्धतीने पण रडले जाते. यामुळे इतरांना हसू होते. हे सर्व टाळण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमादरम्यान रडण्याचे अनेक व्हिडिओ दाखवते. शिवाय, व्हायरल झालेले व्हिडिओही दाखवून कसे रडू नये, याबाबतचे शिक्षण देते. अभ्यासक्रमाची एवढी प्रसिद्धी झाली आहे की. मला जाहिरातच करावी लागली नाही. कोर्स करण्यासाठी विवाह ठरलेल्या भावी वधूंची व तिच्या कुटुंबीयांची रिघ लागली आहे.'

loading image