
ज्या कोव्हिड विषाणूमुळे हजारो लोकांचे जीव गेले. अशा कोव्हिड विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढले असून हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड या आशियातील देशांमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतात देखील कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या बाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पण सध्या या देशांमध्ये जे काही रुग्ण वाढत आहे त्याबाबत पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे यांनी याबाबत माहिती देत हा नवीन विषाणू धोकादायक नसून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जेवढी चर्चा त्या देशांमध्ये कोव्हिड बाबत नाही तेवढी आपल्या देशात होत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.