Health: नव्या Covid केसेसमध्ये 'ही' आहे महत्वाची लक्षणे, 'अशी' घ्यावी काळजी; वाचा डॉक्टरांचा सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New covid cases with new symptoms

Health: नव्या Covid केसेसमध्ये 'ही' आहे महत्वाची लक्षणे, 'अशी' घ्यावी काळजी; वाचा डॉक्टरांचा सल्ला

भारतात दिवसेंदिवस ओम्नीक्रॉन आणि सब वॅरियंटच्या केसेस वाढत चालल्या आहेत. कोविडची नॉर्मल लक्षणे वगळता यावेळी डॉक्टरांना रूग्णांमध्ये काही वेगळी लक्षणे निदर्शनास आली आहेत. रूग्णांमधली ही असाधारण लक्षणे बघता रूग्णांमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. (New covid cases with new symptoms doctor says)

सध्याच्या कोविड रूग्णांमध्ये डॉक्टरांना आढळली 'ही' नवी लक्षणे

छातीत दुखणे

डायरिया

लघवीचे प्रमाण कमी होणे

अशक्तपणा

तात्पुरती चव जाणे

ताप,कफ

सांधेदुखी, शरीरदुखी,डोकेदुखी

नवा ओम्नीक्रॉन BA.2.75 हा धोकादायक नसून रूग्ण एका आठवड्याच्या आत बरा होतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

कोविड आजारापासून बचाव करण्यासाठी ही काळजी

आजारी असेल किंवा नसेलही कोणी तरी सगळ्यापांसून बोलताना थोडे अतंर ठेवावे.

जिथे अंतर ठेवणे शक्य नसेल तेव्हा तिथे मास्क वापरा.

घरात असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा.

तुमचे हात नियमित साबण किंवा अल्कोहोल बेस सॅनिटायजरने स्वच्छ करा.

तुम्हाला बरं वाटत नसेल तर घरीच राहा.

तुम्हाला काही सिम्टम्स दिसत असेल तर लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा: Covid Variant BA.5 : राज्यातून ‘बीए.५’ व्हेरिएंट हद्दपार!

कोविडमध्ये करा हा घरघुती उपाय

तुम्हाला आयसोलेट करून एका रूममध्ये राहा.

आराम करा आणि भरपूर पेयजन्य पदार्थ आहारात घ्या.

तुमचे हात सतत साबणाने आणि पाण्याने धुवा.

तुमच्या वयक्तिक वस्तू कोणास वापरायला देऊ नका.

तुमचं शरीराचं तापमान चेक करत राहा.

Web Title: Doctors Found These Symptoms In New Covid Cases Chest Pain Diarrhoea Decreased Urine Output See Omicron Ba275 Signs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..