
ओमिक्रॉन रूग्णांबाबत डॉक्टरांनी दिली दिलासादायक बातमी
नवी दिल्ली : जगासाह देशात वाढणाऱ्या ओमिक्रॉनच्या (Omicron Variant) वाढत्या रूग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Omicron Cases In India) त्याशिवाय येणाऱ्या काही दिवसात ओमिक्रॉनमुळे देशात तिसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक राज्यांमध्ये पुन्हा रात्रीची संचारबंदीसह अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. या सर्व चिंतेच्या वातावरणात डॉक्टरांनी ओमिक्रॉनच्या रूग्णांमधील लक्षणांबाबत एक दिलासादायक बातमी दिली आहे. (Doctors give good news about Omicron patients Symptoms)
हेही वाचा: ओमिक्रॉनमुळे राज्यात जमावबंदी लागू; वाचा नवी नियमावली
गेल्या काही दिवासांपासून देशातील विविध राज्यांमध्ये ओमिक्रॉन (Omicron Cases Count High In India) बाधितांच्या संख्य़ेत लक्षणीय वाढ झाली असून ओमिक्रॉन बाधितांची देशातील संख्या 358 च्या घरात पोहचली आहे. ओमिक्रॉनची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असून त्या पाठोपाठ राजधानी दिल्लीचा नंबर आहे. परंतु एक दिलासादायक बाब म्हणजे ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये ठेवण्याची गरज भासत नसल्याचे दिल्लीतील LNJP रुग्णालयाचे डॉक्टर सुरेश कुमार यांनी सांगितले आहे. (Maharashtra Omicron Cases)
सुरेश कुमार म्हणाले की, ओमिक्रॉनचे बहुतांश (Omicron patients Symptoms) संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यातील रुग्णांना कुठल्याही प्रकारचे गंभीर लक्षण दिसून आले नाहीत. ओमिक्रॉनच्या ९० टक्के प्रकरणांमध्ये ना कुठलीही लक्षणं आढळली ना त्यांना कुठल्याही उपचाराची गरज भासली. आम्ही अशांना आयसोलेशन वार्डात दाखल केले आहे. जेणेकरुन त्यांच्यावर देखरेख ठेवली जाईल अशी माहितीही डॉक्टरांनी दिली. (Omicron Latest News In Marathi)
Web Title: Doctors Give Good News About Omicron Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..