शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला 'कुत्रा' म्हटलं अन्...; तुमचाही उडेल थरकाप : Dog calling Dog | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dog

Dog calling Dog: शेजाऱ्याच्या पाळीव कुत्र्याला 'कुत्रा' म्हटलं अन्...; तुमचाही उडेल थरकाप

चेन्नई : कुत्र्याला कुत्रा म्हटल्यानं एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तामिळनाडूतील थाडीकोम्बू इथं घडला आहे. या विचित्र घटनेमुळं देशभरात हा विषय चर्चेचा विषय बनला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. (Dog calling Dog Tamil Nadu man killed for calling neighbour dog a dog)

हेही वाचा: Awhad on Koshyari: "राज्यपालांची इच्छा म्हणजे दिल्लीश्वरांचा महाराष्ट्राला इशारा"; आव्हाड असं का म्हणाले?

खून झालेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव रयाप्पन (वय ६५) यांना शेजाऱ्याच्या कुत्र्याचा त्रास होत होता. या कुत्र्याबाबत शेजाऱ्यांकडं तक्रारी केल्या होत्या. येणाऱ्या जाणाऱ्याच्या अंगावर हा कुत्रा धाऊन जात असल्यानं रयाप्पन या कुत्र्याला वैतागले होते. ज्यांच्या मालकीचा हा कुत्रा आहे, ते डॉनियल आणि विन्सन्ट रयाप्पन यांचे नातेवाईकच आहेत.

हेही वाचा: ZP School : सरकारी शाळाच भारी! एकाच विद्यार्थ्यासाठी रोज भरतो वर्ग, मिळतात सगळ्या सोयीसुविधा

दरम्यान, या वादाला सुरुवात झाली ती रयाप्पन यांनी डॉनियल आणि विन्सन्टच्या कुत्र्याला त्याच्या नावानं हाक मारण्यास नकार दिला आणि त्याला कुत्रा असं संबोधलं. तसेच या कुत्र्याच्या गळ्यात कायम पट्टा बांधून ठेवा असंही त्यांना सांगितलं. गुरुवारी हा वाद विकोपाला गेला.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

त्यानंतर वादावादी दरम्यान रयाप्पन यांनी या कुत्र्याला मारण्यासाठी काठी हातात घेतली. हे पाहताच डॉनियल आणि विन्सन्ट हे दोघेही चिडले आणि त्यांनी रयाप्पन यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर रयाप्पन हे बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Desh news