
पंजाबमधील मोहालीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी ऐकून तुमची झोप उडू शकते. गेल्या काही वर्षांत मोमोजची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. पूर्वी हिरव्या भाज्या आणि पिठापासून बनवलेले मोमोज फार कमी ठिकाणी उपलब्ध होते. पण आता प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक रस्त्याच्या कडेला, मोठ्या दुकानांमध्ये आणि अगदी मल्टी-स्टार हॉटेल्समध्येही वेगवेगळ्या प्रकारात मोमोज मिळतात. जे निःसंशयपणे खूप चविष्ट असतात. मात्र मोहालीत एक अजब घटना घडली आहे.