esakal | श्वान दूर ठेवतो हृदयविकाराचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

श्वान दूर ठेवतो हृदयविकाराचा धोका

हा निष्कर्ष एका परदेशी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून सिद्ध झाला आहे.

श्वान दूर ठेवतो हृदयविकाराचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

प्राग : तुम्ही एखादा श्वान दत्तक घेण्याचा विचार करत आहात तर तुम्हाला हे वाचून नक्की आनंद होईल की, माणसाचा सच्चा मित्र आणि इमानदार प्राणी अशी ओळख असणारा श्वान हा आपल्या घराच्या राखणदारीसह आपले आरोग्य नीट ठेवण्यास ही मदत करतो. हा निष्कर्ष एका परदेशी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून सिद्ध झाला आहे. विशेष म्हणजे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार दूर ठेवण्यास श्वान मदत करत असल्याचे ही या अभ्यासातून समोर आले आहे. 

झेक प्रजासत्ताक या देशातील एक संस्था 6 वर्षांपासून करत असलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष यंदा 2019 ला समोर अला असून यानुसार पाळीव प्राणी ज्यांच्या घरी आहेत अशा लोकांना सहसा हृदयसंबंधी आजार होत नाहीत तसेच त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य देखील आनंददायी राहते.

आजकालच्या वेगवान जीवनात आरोग्यावर लक्ष देण्यासाठी व्यायाम आणि पोषक आहार घेणे सर्वांनाच जमते असे नाही. त्याउलट ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहे, त्यांचा दिवसभर त्या प्राण्यामुळे इतका व्यायाम होतो की, त्यांना इतर कोणत्याही व्यायामाची गरज लागत नाही.

दिवसभरच्या व्यायामामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य आपोआपच तंदरुस्त राहते व त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार सहसा उद्धवत नाहीत. तसेच दिवसभर आपल्या लाडक्या प्राण्याच्या  वावरामुळे त्यांचा ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास देखील वाढतो. मात्र या पाळीव प्राण्यांत सर्वाधिक फायदा हा श्वान असणा-या व्यक्तींना झाला असल्याचे या अभ्यासात समोर आले आहे. 
 

loading image
go to top