समलिंगी मालकाच्या कुत्र्याला मंकीपॉक्सची लागण, मंकीपॉक्स माणसापासून प्राण्यांमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Monkeypox Update

समलिंगी मालकाच्या कुत्र्याला मंकीपॉक्सची लागण, मंकीपॉक्स माणसापासून प्राण्यांमध्ये

मंकीपॉक्स वायरस बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंकीपॉक्स वायरस प्रथमच प्राण्यांनमध्ये संक्रमित झाल्याची घटना घडली आहे. फ्रांसीसी रिसर्चर्स मध्ये एका कुत्र्याला मंकीपॉक्सची लागन झाल्याचे सिध्द झाले आहे. संशोधकांचा असा दावा आहे की हा विषाणू माणसापासून प्राण्यांच्यात पसरल्याची पहिलीच घटना असावी.

द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रकानुसार, पॅरिसमधील सोरबोन युनिव्हर्सिटीच्या टीमने पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या दोन (गे) पुरुषांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचे प्रकरण आढळला आहे. या लॅटिन पुरुषांपैकी एक 44 वर्षांचा आहे आणि तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.

दरम्यान, तो एचआयव्हीसाठी अँटीरेट्रोव्हायरल औषध घेतो त्याचा अनडिटेकटेबल वायरस आहे. आणखी एका माणूस एचआयव्ही-निगेटिव्ह आहे, आणि तो 27 वर्षांचा आहे. मंकीपॉक्सच्या लक्षणांची सुरूवाती नंतर 12 दिवसा नंतर कुत्रा संक्रमीत आढळला.कुत्रा नर आहे,आणि त्याचे वय 4 वर्षे आहे.

हेही वाचा: ८ वेळा लग्न-८ पोरांचा बाप, तरी समाधान नाहीच; म्हातारवयात शोधतोय ९ वी बायको

रिसर्च टीमच्या म्हण्यानुसार ,मंकीपॉक्स संक्रमित आढळला आहे,त्याला आगोदर कोणताही आजार नव्हता. दोन्ही गे पुरूष कोणत्याही नात्यात नव्हते .परंतु दोघेही एकाच घरात राहत होते. टीमने कुत्रा आणि लॅटिन माणसाकडून मंकीपॉक्स विषाणूचे डीएनए काढले,व चाचणी केली आणि दोन्ही नमुन्यांमध्ये hMPXV-1 क्लेड, वंश B.1 चे विषाणू असल्याचे आढळले.

युनिव्हर्सिटीच्या संसर्गजन्य रोग विभागाच्या सोफी सियांग यांनी त्यांच्या टीमने सांगितले की, आमच्या माहितीनुसार, दोन्ही रुग्णांमध्ये लक्षणे एकाच वेळी सुरू झाली आणि त्यानंतर, मंकीपॉक्स विषाणू माणसापासून कुत्र्यांमध्ये प्रसारित झाला असावा.

Web Title: Dog Tests Positive Monkeypox First Human Animal Transmission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :DogMonkeypox