८ वेळा लग्न-८ पोरांचा बाप, तरी समाधान नाहीच; म्हातारवयात शोधतोय ९ वी बायको

वयाच्या ७४ वर्षात 'मी हार मानणार नाही' असे म्हणणारा हा व्यक्ती म्हातारवयात त्याच्या नवव्या पार्टनरच्या शोधात आहे.
Man married to 8 times and finding 9th wife
Man married to 8 times and finding 9th wifeesakal

अनेकांचं लग्न हे ड्रीम असतं. लग्न हा थाटामाटात पार पडणारा सोहळा असतो. मात्र आठ वेळा लग्न करूनही नवव्या बायकोच्या शोधात असणारा हा व्यक्ती दूर्मिळच म्हणावा. ७४ वर्षीय हा व्यक्ती आता म्हातारवयात त्याच्या नवव्या बायकोच्या शोधात आहे. (Man married to 8 times and finding 9th wife)

८ पोरं आणि आठ वेळा लग्न

रॉन शेपर्ड हा ७४ वर्षीय व्यक्ती परत एकदा लग्नासाठी तयार असणारा म्हातारा पण एका पहिल्या लग्नास तयार असणाऱ्या तरूणाएवढा उत्सुक आहे. लग्नास त्याला बायको मिळाल्यास हे त्याचं नववं लग्न असणार आहे. रॉन शेपर्ड हा ब्रिटनमध्ये राहाणार एक ७४ वर्षीय माणूस आहे.

सिंगल राहाणं मला आवडत नाही असं रॉनचं म्हणणं आहे. तसेच फिरण्यासाठी हा व्यक्ती एका पार्टनरच्या शोधात आहे. याआधी एका अमेरिकी महिलेशी रॉनचा साखरपुडा झाला होता. मात्र २०१९ मध्ये त्यांनी एकमेकांशी नातं तोडलं. तेव्हापासनं रॉन एकटे राहात होते.

Man married to 8 times and finding 9th wife
निष्काळजीपणाचा कळस ! Domino's मध्ये चक्क पिझ्झा बेसवर टांगलेत टॉयलेट ब्रश

रॉन हे कॉमेडियन नॉर्मन विजडमचे पूर्व टूर मॅनेजर होते. ते म्हणाले मला, 'असं वाटलं होतं की माझी पूर्व पत्नी फिलिपिनो लालेक त्यांना कधीच विसरणार नाही पण मात्र ५ वर्षाआधीच ती त्यांना सोडून गेली. तेव्हापासून ते त्यांच्या नव्या पत्नीच्या शोधात आहे.'

हार मानणार नाही

रॉन म्हणाले, 'मी आताही प्रेमाच्या आशेत आहे. मी कधी हार मानणार नाही. मला एकटं राहाणं अजिबात आवडत नाही.'

Man married to 8 times and finding 9th wife
Viral Video: दोस्ती लई भारी ! चक्क माकड करतंय माणसाचं सांत्वन

८ पोरं आणि १३ नातवंड

१९६६ मध्ये त्यांनी मार्गारेटसोबत पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या दोन वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. रॉन यांची दुसरी पत्नी जेनेट हीने एका वर्षातच घटस्फोट घेतला. अशी रॉनने एकूण आठ लग्न केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com