esakal | गुजरातमध्ये ट्रम्प यांच्या मार्गावरील कुत्रे, पानटपऱ्याही होणार गायब

बोलून बातमी शोधा

Dogs disappear from Donald Trump route
गुजरातमध्ये ट्रम्प यांच्या मार्गावरील कुत्रे, पानटपऱ्याही होणार गायब
sakal_logo
By
वृत्तसेवा

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा  अनेक कारणांसाठी गाजत आहे. झोपडपट्ट्यांसमोर भिंती बांधल्याचा वाद नवीन असतानाच ट्रम्प यांच्या मार्गावरील कुत्रे आणि पानटपऱ्याही गायब होणार आहेत. याबाबतची सर्व काळजी अहमदाबाद महानगरपालिका घेत आहे. आतापर्यंत तीन पानटपऱ्या सील करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तत्पूर्वी, अहमदाबादेत आल्यानंतर ट्रम्प यांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्याचे काम हे सीआयएच्या दोनशे अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येईल. देशभरातील दोनशेपेक्षाही अधिक गुप्तचर संघटनांशी समन्वय ठेवून ते काम करतील.

अनेकांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

ट्रम्प यांच्या ताफ्यामध्ये अत्याधुनिक गाड्यांसह स्नायपर, स्पाय कॅमेरे आणि फायर सेफ्टी सिस्टिम असलेल्या उपकरणांचाही समावेश आहे. ट्रम्प यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे थेट प्रसारण करण्यासाठी दूरदर्शन ३० किलोमीटरपेक्षाही अधिक लांबीची ऑप्टिकल फायबर लाइन टाकणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जंगी स्वागतासाठी गुजरात सरकारने अक्षरशः पायघड्या अंथरल्या असून, ट्रम्प यांची जिथे नजर जाईल तिथे सगळे काही चकचकीत करण्याचा विडाच राज्य सरकारने उचललेला आहे.