esakal | अनेकांना दिग्गजांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Radhakishan Damani becomes India’s 2nd richest person

अनेकांना मागे टाकत राधाकिशन दमानी ही व्यक्ती भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. राधाकिशन दमानी हे डी-मार्टचे संस्थापक आहेत.  दमानी यांनी शिव नाडर, गौतम अदानी या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

अनेकांना दिग्गजांना मागे टाकत 'ही' व्यक्ती बनली भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती

sakal_logo
By
वृत्तसेवा

मुंबई : अनेकांना मागे टाकत राधाकिशन दमानी ही व्यक्ती भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती बनली आहे. राधाकिशन दमानी हे डी-मार्टचे संस्थापक आहेत.  दमानी यांनी शिव नाडर, गौतम अदानी या दिग्गजांना मागे टाकलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दमानींची संपत्ती आता जवळपास 1,25,000 कोटी रुपये झाली आहे. देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींच्या नंतर दमानींचा क्रमांक लागतो. फोर्ब्स रियल टाइम बिलिनिअरीज इंडेक्सनुसार गेल्या आठवड्यात अॅव्ह्येन्यू सुपरमार्केटचे शेअर्स 5 टक्के वाढले होते. म्हणून दमानींच्या संपत्तीत वाढ झाली. शनिवारी दमानी यांची नेटवर्थ 17.8 डॉलरपर्यंत पोहोचली होती. तिसऱ्या तिमाहीत अॅव्हेन्यू सुपरमार्केटच्या नफ्यात 53.3 टक्क्यांची वाढ झाली होती. कंपनीला यामध्ये 394 कोटी रुपयांचा फायदा झाला. दमानी यांच्यानंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे शिव नाडर, उदय कोटक आणि गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो. 

काँग्रेसच्या 'या' दिग्गज नेत्याची होणार चौकशी; चारशे कोटींचे प्रकरण

तत्पूर्वी, राधाकिशन दमानी यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीने केली होती. 1980 मध्ये राधाकिशन दमानी यांनी शेअर बाजारात एक गुंतवणूकदार म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी डी-मार्टच्या आयपीओची घोषणा केली. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमानी फक्त एका रिटेल कंपनीचे मालक होते. पण, 21 मार्चच्या सकाळी त्यांच्या कंपनीच्या शेअरचं ट्रेडिंग BSEमध्ये सुरू झालं तेव्हांच त्यांची संपत्ती 100 पटीने वाढली होती.

loading image